Vegvashata Class 12 Marathi Chapter 1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 1 वेगवशता Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

12th Marathi Chapter 1 Exercise Question Answer Maharashtra Board

वेगवशता 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 1 वेगवशता Textbook Questions and Answers

कृती 

1. अ. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1. अ
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 2
उत्तर :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 3

आ. कृती करा.

प्रश्न 1. आ.
कृती करा
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 4.1

उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 5.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 6.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 7.1

इ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ………………. .
उत्तर :
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ………………… .
उत्तर :
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.

2. अ. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

प्रश्न 1.
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ………………….
अ. वाहन कामापुरतेच वापरले तर.
आ. वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
इ. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
उत्तर :
ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

प्रश्न 2.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे……………..
अ. स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
आ. वाहनाचा अतिवेग अंगीकारणे.
इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
ई. गरज नसताना वाहन वापरणे.
उत्तर :
इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

आ. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 1
उत्तर :

अमेरिका भारत
घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते. अंतरे कमी आहेत.
रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी माणसे खूप आहेत.
कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात. कामे फारशी नसतात.
दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो. महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत.

3. खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न अ.
यथाप्रमाण गती ही गरज आहे ; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
उत्तर :
योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रितीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.

प्रश्न आ.
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
उत्तर :
सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. थोड्या काळासाठीच जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे, तर केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे.

सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच. असे करता करता दिवसाला एक पाकीट कधी होते हे कळतच नाही. नंतर नंतर सिगारेट मिळाली नाही तर त्या व्यक्तीचे मनःस्वास्थ्यच नाहीसे होते. सिगारेटशिवाय ती राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तद्वतच माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न इ.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
उत्तर :
वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात. आपली कामे भराभर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. यापलीकडे आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह, उल्हास शरीरात सळसळतो. म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.

आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत.

एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.

4. व्याकरण.

अ. समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न अ.
समानार्थी शब्द लिहा.

  1. निकड –
  2. उचित –
  3. उसंत –
  4. व्यग्न –

उत्तर :

  1. निकड – गरज
  2. उचित – योग्य
  3. उसंत – सवड
  4. व्यग्र – गर्क

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

आ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

प्रश्न आ.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

  1. ताणतणाव –
  2. दरडोई –
  3. यथाप्रमाण –
  4. जीवनशैली –

उत्तर :

  1. ताणतणाव – ताण, तणाव वगैरे → समाहार व्वंद्व
  2. दरडोई – प्रत्येक डोईला → अव्ययीभाव
  3. यथाप्रमाण – प्रमाणाप्रमाणे → अव्ययीभाव
  4. जीवनशैली – जीवनाची शैली → विभक्ती तत्पुरुष

इ. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

प्रश्न इ.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

  1. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
  2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
  3. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)

उत्तर :

  1. किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात!
  2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.
  3. माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

5. स्वमत.

प्रश्न अ.
‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो.

फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो, तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे.

पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतींतून शारीरिक हालचाली घडत असतात. या हालचालींमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो.

शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न आ.
‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हसित मन:स्थितीत असतात. सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हळूहळू सुरसुरी येते. तो हळूहळू वेग वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात.

चालक हळूहळू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत, कमकुवत आहेत, आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते.

क्लच, ब्रेक, अक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो.

त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न इ.
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे. अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते.

अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते. माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे.

ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न ई.
‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
वाहनाची अतिगती ही विकृती आहे, हे विधान शंभर टक्के सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही ते. कल्पना करा. आपल्याला चॉकलेट खूप आवडते. सर्व जगात असे किती जण आहेत, जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात? समजा एखादयाला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो. घराला पांढरा रंग देतो. अंथरुणे-पांघरुणे पांढरी, खिडक्यांचे पडदे पांढरे, भांडीकुंडी, फर्निचर पांढऱ्या रंगाचे. हे असे करणारा जगामध्ये.

एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात. उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते. पण अशा त-हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का? जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरे तर प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय. रोजच्या जेवणात वरण-भात आणि भाजी-पोळी असणे, घरात विविध रंगसंगती योजणे, पायांनी चालणे हे सर्व सहज, नैसर्गिक आहे.

सर्व माणसे तसेच वागतात. हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवत, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता, सुरक्षितपणे, वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो. हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो. म्हणून अतिवेग ही विकृती होय, हेच खरे.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
उत्तर :
सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुंदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता.

आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वत:ची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.

अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही.

उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न आ.
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो.

गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी :

  • प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), अन्य आवश्यक कागदपत्रे (विमा, पीयुसी इत्यादी) घेतल्याची खात्री करून घ्यावी.
  • टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी.
  • गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना दयावी. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे त्याची माहिती दयावी.

प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी :

  • गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे.
  • गाडीतील प्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये.
  • गाडीचा वेग पन्नास-साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये; कारण आपल्याकडील रस्ते अजूनही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत.
  • जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो. शारीरिक व्याधी जडतात. म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा.
  • गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही. तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना दयाव्यात.
  • स्वत:ची लेन सोडून जाऊ नये.
  • लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल दयावेत.
  • वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
  • गाडीत धूम्रपान, मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये.

अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

उपक्रम :

‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी’ यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या/मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा.

तोंडी परीक्षा :

‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 1 वेगवशता Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

प्रश्न 1.
1. वाहनाचा वेग अनिवार झाला, तर …….
2. शरीर-मनावरील ताण नाहीसे होतात.
3. शरीरभर आनंदाची स्पंदने निर्माण होतात.
4. आरोग्याची हानी होते.
5. एकाच जागी तासन्तास जखडून बसण्याचे शारीरिक कौशल्य अवगत होते.
उत्तर :
4. आरोग्याची हानी होते.

पुढील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा :

प्रश्न 1.
जीवन हे दशदिशांना विभागले आहे.
उत्तर :
आधुनिक काळात खूप प्रगती झाल्यामुळे माणसे पूर्वीच्या काळापेक्षा कमी वेळात जास्त कामे करतात. त्यामुळे कामांची ठिकाणे अनेक असतात. ही ठिकाणे दूर दूर पसरलेली असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते.
उत्तर :
अमेरिकेसारख्या देशामध्ये राहण्याची ठिकाणे, नोकरीव्यवसायाची ठिकाणे, अन्य कामाची ठिकाणे ही सर्व दूर दूर अंतरावर असतात. ही अंतरे पार करण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. भारतातील अनेक व्यक्तींची मुले अमेरिकेसारख्या दूरदूरच्या देशांमध्ये राहतात. ही सर्व माणसे एकमेकांना नियमितपणे व सहजपणे भेटू शकत नाहीत. साहजिकच अंतरामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.

शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात. अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही.

मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 3.
रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का?
उत्तर :
रस्त्याने कोणीही चालण्याऐवजी पळू लागला, तर कोणीही कौतुक करणार नाही. रस्ते, वाटा या चालण्यासाठी असतात. माणसे सर्वसाधारणपणे जशा कृती करतात, जशी वागतात, तशी वागली तर लोकांना बरे वाटते. वेगळी वागली, तर काहीतरी विचित्र घडत आहे, असे वाटू लागते.

लिहा :

प्रश्न 1.

  1. घरोघर व दरडोई वाहन उपलब्ध असलेला देश : ………….
  2. वेगामुळे बेभान होणारी : ………….
  3. अमेरिकन जीवनशैली ज्यांनी पत्करू नये ते : ………….
  4. गाड्यांनी एकमेकांना जोडली जाणारी : ………….
  5. वाहनांमुळे वाचतात : ………….
  6. माणसांवर स्वार होणारी : ………….

उत्तर :

  1. अमेरिका
  2. माणसे
  3. भारतीय
  4. महानगरे
  5. वेळ, श्रम
  6. वाहने.

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 8.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 9.1

प्रश्न 2.
Maharashtra-Board-Class-12-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-1-वेगवशता-11
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 10.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 13.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 11.1

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 14.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 15.1

रिकाम्या चौकटी भरा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 12.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 13.1

रिकाम्या जागा भरा :

प्रश्न 1.
वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर …
i. ………………….
ii. …………………
उत्तर :
वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर …
i. तातडीने शेतमळ्यावर जाण्याची वेळ आली.
ii. आपण गावाबाहेर राहत असू.

प्रश्न 2.
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे …..
उत्तर :
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा : 

प्रश्न 1.
वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात त्यामागील कारण लिहा.
उत्तर :
वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात, त्यामागील कारण अतिघाई किंवा अतिवेग यांत कोणतेही औचित्य नसते.

प्रश्न 2.
अपघात होण्याची दोन कारणे लिहा.
उत्तर :

  • वेग वाढल्यामुळे वाहनावरचा ताबा सुटणे आणि
  • पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यास या दोन कारणांनी अपघात होतात.

वाक्ये पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. जर वाहनाचा वेग वाढला, तर …………..
  2. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा जर हव्यास बाळगला, तर …………
  3. रात्री भरधाव वेगाने प्रवास करू नये; कारण ………….

उत्तर :

  1. जर वाहनाचा वेग वाढला, तर त्यावरचा ताबा कमी होतो.
  2. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा जर हव्यास बाळगला, तर अपघात होतो.
  3. रात्री भरधाव वेगाने प्रवास करू नये; कारण झटपट पार पडलीच पाहिजेत अशी महत्त्वाची कामे दरवेळी नसतात.

व्याकरण :

वाक्यप्रकार:

वाक्यांच्या आशयावरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. वेग हे गतीचे रूप आहे. → [ ]
  2. जीवनाची ही टोके सांधणार कशी? → [ ]
  3. बापरे! किती हा जीवघेणा वेग! → [ ]

उत्तर :

  1. विधानार्थी वाक्य
  2. प्रश्नार्थी वाक्य
  3. उद्गारार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

  1. गतीला जेव्हा दिशा असते, तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. → [ ]
  2. सुसाट गतीला आवरा. → [ ]
  3. कामापुरते व कामासाठी वाहन काढावे. → [ ]
  4. वाहनांच्या वेगाची चिंता वाटते. → [ ]

उत्तर :

  1. संकेतार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. स्वार्थी वाक्य

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. अचानक वेग वाढतो. → [ ]
  2. माणसाने वाहन चालविले. → [ ]
  3. माणसाने वेगाला आवरावे. → [ ]

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग

अलंकार :

पुढील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
आईसारखे दैवत आईच होय!
उत्तर :
अनन्वय अलंकार

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

शब्दार्थ :

  1. प्रगती – जीवनाचा स्तर, दर्जा उंचावणे.
  2. अगतिक – असहाय, केविलवाणे.
  3. अवखळ – खट्याळ, उपद्रवी.
  4. उरकणे – आटोपणे.
  5. यथाप्रमाण – आवश्यक तेवढे.
  6. त्वरा – घाई, जलदगती.
  7. कृतकृत्य – धन्य, यशस्वी.
  8. अनिवार – अतिशय.
  9. भावविवश – हळवा, भावनाप्रधान.
  10. यथासांग – (यथा + स + अंग) आवश्यक त्या सर्व बाजूंनी.

वाक्प्रचार व त्याचा अर्थ :

यथासांग पार पाडणे – सर्व बाजू पूर्ण करून पार पाडणे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Pdf भाग-१

Udyanat Bhetlela Vidyarthi Class 6 Marathi Chapter 7 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 6th Marathi Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Question Answer Maharashtra Board

Std 6 Marathi Chapter 7 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Textbook Questions and Answers

1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत ?
उत्तर:
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी बाकावर बसून पुस्तक वाचण्यासाठी येत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न आ.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
उत्तर:
उद्यानात गुरुजींचे लक्ष थोड्या अंतरावर बसून पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे गेले.

प्रश्न इ.
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विदयार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटले ?
उत्तर:
गुरुजींना उद्यानात एक विद्यार्थी सलग तीन दिवस वाचन करत बसलेला दिसला. तो इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नसे, म्हणून गुरुजींना त्याची विचारपूस करावी असे वाटले.

प्रश्न ई.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
उत्तर:
केळूस्कर गुरुजी व डॉ. आंबेडकर यांची रोज उद्यानात भेट होऊ लागली. गुरुजी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले, त्यामुळे दोघांची गट्टी जमली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न उ.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
उत्तर:
डॉ. आंबेडकरांनी मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचे सोने करून, उच्चविद्याविभूषित होऊन, जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला.

2. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

प्रश्न अ.
“बाळ, तुझं नाव काय?”
उत्तर:
भीमराव रोज उदयानात पुस्तक वाचत असलेला पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

प्रश्न आ.
“चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.”
उत्तर:
भीमरावला अवांतर वाचनाची आवड असलेली पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न इ.
“मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”
उत्तर:
काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन, असे गुरुजींनी सांगितल्यावर भीमराव गुरुजींना म्हणाले.

3. असे का घडले? ते लिहा.

प्रश्न अ.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उदयानात वाचत बसलेल्या विदयार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
उत्तर:
उदयानात वाचत बसलेला विदयार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता तर सतत तीन दिवस गुरुजी त्याला वाचन करताना पाहत होते. म्हणूनच त्यांच्या मनात या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न आ.
भीमराव उदयानात वाचत बसायचे.
उत्तर:
भीमरावांना शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती म्हणून शाळा सुटल्यानंतर उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसायचे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न इ.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
उत्तर:
गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत. भीमरावच्या वाचनामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

प्रश्न ई.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
उत्तर:
भीमरावला वाचन कसे करावे हे गुरुजींनी समजाविले. काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन असे जेव्हा गुरुजी म्हणाले तेव्हा भीमरावने वाचनाची तयारी दर्शवली. तेव्हा मायेने गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

प्रश्न उ.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
उत्तर:
केळूस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ताओळखून महाविदयालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

4. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. 

प्रश्न 1.
पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विदयार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
उत्तरः
(अ) गुरुजींनी विदयार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(आ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(इ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ई) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली
(उ) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

5. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
(अ) तुझ्याजवळ
(आ) दिवसापासून
(इ) मार्गदर्शन
(ई) आवडतील

प्रश्न 1.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
उत्तरः

  1. वाचनाला – वाचला, नाच, नाला, लावा, चना
  2. दिवसापासून – दिवसा, सून, पान, वसा, दिन, पाव, सासू
  3. मार्गदर्शन – मार्ग, दर्श, दमा, दर्शन, मान
  4. आवडतील – वड, आड, आव, आतील, लव
  5. महाविदयालयीन – मन, हाल, महाल, नदया, मल, विमल

6. खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
(अ) लेखक
(आ) पुस्तक
(इ) शाळा
(ई) भेट
(उ) शिफारस
(ऊ) शब्द
उत्तरः
(अ) लेखक
(आ) पुस्तके
(इ) शाळा
(ई) भेटी
(उ) शिफारसी
(ऊ) शब्द

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

7. आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई – वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य

प्रश्न 1.
आंतराजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे गावात दिनांक 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. त्यांनी एम.ए., पी.एच.डी. पर्यंत शिक्षण घेतलेच पण डी.एस.सी, एल.एल.डी., डी.लि.ट, बॅरिस्टर एंट लॉ. या पदव्याही प्राप्त केल्या. भगवान बुद्ध आणि धम्म, धर्मांतर कां? जातिप्रथेचे विध्वंसन, पुणे करार, शुद्र पूर्वी कोण होते, बुद्ध की कार्ल मार्क्स अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे स्त्रीविषयक माहितीपर व माझी आत्मकथा हे व्यक्तिचित्रण ही त्यांनी लिहिले आहे. त्यांनी महाडच्या तळ्यातील पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले. नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मुलमंत्र त्यांनी दलितांना दिला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न’ हा किताब भारत सरकारने बहाल केला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

8. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द – सुशब्द, अपशब्द.
(आ) स्पष्ट – सुस्पष्ट, अस्पष्ट.
(इ) बुद्धी – सुबुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

9. खालील शब्द असेच लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 2

उपक्रम: वेगवेगळ्या वृत्तपत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा व वहीत चिकटवा. त्याचे वाचन करा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 3

सांगा पाहू.

प्रश्न 1.
कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालव नका असा नेहमी उपदेश करतो
उत्तर:
घड्याळ

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 2.
शिस्तीचे धडे, उत्तम गडे, कणकण शोधते, कधीच न रडे
उत्तर:
मुंगी

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Important Additional Questions and Answers

चूक की बरोबर ते लिहा.

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे.
  2. गुरुजी सोबत आणलेले वर्तमानपत्र वाचत.
  3. भीमरावाला अवांतर पुस्तके वाचनाची आवड होती.
  4. इतर मुलांसारखा भीमरावही मस्ती करीत होता.
  5. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.

उत्तर:

  1. बरोबर
  2. चूक
  3. बरोबर
  4. चूक
  5. बरोबर

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चर्नीरोड उद्यानात सायंकाळी कोण कोण येत?
उत्तर:
चर्नीरोड उदयानात सायंकाळी अनेक नागरिक फिरायला येत. तसेच विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विदयाव्यासंगी लेखक केळूस्कर गुरुजी व भीमराव येत असत.

प्रश्न 2.
भीमरावांनी स्वत:बद्दलची कोणती माहिती गुरुजींना सांगितली?
उत्तर:
भीमराव एलफिन्स्टन हायस्कूल, भायखळा येथे शिकत आहेत. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची त्यांना आवड आहे व शाळा सुटल्यानंतर ते चर्नी रोड उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसतात ही माहिती भीमरावांनी गुरुजींना सांगितली.

प्रश्न 3.
भीमरावांनी संधीचे सोने कसे केले?
उत्तर:
आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने, वाचनाने व कष्टाने ते जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विदयाविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. अशाप्रकारे भीमरावांनी संधीचे सोने केले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. संधी
  2. महाविदयालय
  3. विद्वान
  4. विदयार्थी

उत्तर:

  1. संधी
  2. महाविदयालये
  3. विद्वान
  4. विदयार्थी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
बाळ तुझं नाव काय.
उत्तर:
“बाळ तुझं नाव काय?”

प्रश्न 2.
वा छान नाव आहे तुझं.
उत्तर:
“वा! छान नाव आहे तुझं!”

प्रश्न 3.
जरुर दया गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील.
उत्तर:
“जरुर दया गुरुजी! मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. मुख्याध्यापक
  2. विदयार्थी
  3. बालक
  4. माता
  5. महाराजा
  6. विद्वान
  7. शिक्षक
  8. लेखक
  9. मित्र

उत्तर:

  1. मुख्याध्यापिका
  2. विद्यार्थिनी
  3. बालिका
  4. पिता
  5. महाराणी
  6. विदूषी
  7. शिक्षिका
  8. लेखिका
  9. मैत्रिण

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे.
उत्तर:
शास्त्रीय प्रयोगामुळे विदयार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न 2.
संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
उत्तर:
अपार कष्टाने डॉ. रघुनाथ माशेलकरांनी संधीचे सोने केले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 3.
नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे
उत्तर:
गायनामुळे लता मंगेशकरने नावलौकिक मिळवला.

लेखन विभाग:

सांगा पाहू.

प्रश्न 1.
भिंतीवर चढतो, खाली पडतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जाळे विणतो, हार न मानतो.
उत्तर:
कोळी

उद्यानात भेटलेला विद्यार्थी Summary in Marathi

पाठ परिचयः

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 1

प्रस्तुत पाठात बालपणी डॉ. भीमराव आंबेडकरांना वाचनाची किती आवड होती व त्यांचा हा वाचननाद केळूस्कर गुरुजींनी कसा ओळखला याचे वर्णन केले आहे. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाने व शिफारसीने भीमराव उच्च शिक्षण घेऊ शकले व उच्च विद्याविभूषित होऊन स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहू शकले, ‘वाचाल तर वाचाल’ हे किती सार्थ आहे हे या पाठातून कळते.

शब्दर्थ:

  1. उदयान – बाग (garden)
  2. सायंकाळ – संध्याकाळ (evening)
  3. नागरिक – रहिवासी (citizen)
  4. विदयाव्यासंगी- अभ्यासाची आवड असणारे (studious)
  5. बाक – बसण्याची जागा (bench)
  6. कुतूहल – जिज्ञासा (curiosity)
  7. आपुलकीने – आपलेपणाने (affectionately)
  8. आदर – सन्मान (respect)
  9. आतुरता – उत्सुकता (excitement, eagerness)
  10. विस्तृत – अफाट, मोठे (vast)
  11. अभेदय – तोडता न येणारी (imperitrable)
  12. तल्लख – तीक्ष्ण (sharp)
  13. गट्टी – मैत्री, दोस्ती (friendship)
  14. शिफारस – नाव सुचविणे (recommendation)
  15. नावलौकिक – प्रसिद्धी (fame, popularity)
  16. राज्यघटना – संविधान (constitution)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे
  2. संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
  3. नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे

Marathi Sulabhbharati Class 6 Solutions

Lake Class 7 Marathi Chapter 11.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11.1 लेक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 11.1 लेक (कविता) Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 11.1 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 11.1 लेक Textbook Questions and Answers

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
उत्तर:
लेक घरात नसताना कवयित्रीच्या उरास लेकीची आस उदास होते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?
उत्तर:
लेक चिमणीप्रमाणे घरात सतत चिवचिवत राहते म्हणजे बोलत राहते, हसत राहते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे.

प्रश्न 3.
कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?
उत्तर:
कवितेतील लेक थोडे रागावले तरी रुसून बसते.

2. खालील आकृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक 1
प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक 2
उत्तरः

  1. मनाची काळजी मिटते
  2. घरात रोज समई पेटते
  3. साऱ्या घरात हसते
  4. तिला निसर्गाची भाषा कळते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

3. तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?

प्रश्न 1.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?
उत्तरः
माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो. पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने-सुने वाटते.

4. पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

प्रश्न 1.
पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

खेळूया शब्दांशी.

प्रश्न अ.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
उदा. कुंदन – गोंदन
उत्तरः

  1. कुंदन – चंदन
  2. मनाची – घराची
  3. मिटते – पेटते
  4. उरास – उदास
  5. हसते – बसते
  6. भाषा – आशा

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

वाचा.

आई म्हणते माझा छावा,
बाबांचा मी बोलका रावा,
ताई म्हणते मला राजा,
तिच्याशी खेळताना येते मजा.

आजोबांचा मी गुणांचा ठेवा,
आजी करते माझी वाहवा,
धावून करतो कामे चार,
सर्वांचा मी लाडका फार.

मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान.

प्रश्न 1.
मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान.

भाषेची गंमत पाहूया.

प्रश्न 1.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ना ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक 3
उत्तरः

  1. वावा! पांढराशुभ्र ससा अन् त्याची चपळाई मन हरखून टाकते.
  2. छान! सईचा नवीन फ्रॉक फारच सुंदर आहे.
  3. आई ग! ठेच लागली आणि कळ मस्तकात” गेली.

वाचा. समजून घ्या.

आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहेत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक 4

Class 7 Marathi Chapter 11.1 लेक Additional Important Questions and Answers

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेखिकेच्या मते, उरास’ आसकेव्हा लागते?
उत्तरः
लेखिकेच्या मते, लेक घरात नसली की उरास आस लागते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
मनाची काळजी केव्हां मिटणार आहे?
उत्तर:
लेक असली की मनाची काळजी मिटणार आहे.

प्रश्न 3.
वेळ जागीच थांबते, असे लेखिका केव्हा म्हणते?
उत्तर:
लेक घरात नसल्यावर, उरास आस लागते आणि वेळ जागीच थांबते, असे लेखिका म्हणते.

प्रश्न 4.
कोण रुसले तरी पर्वा करू नये?
उत्तरः
सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 5.
निसर्गाची भाषा फक्त कोणाला कळते?
उत्तर:
निसर्गाची भाषा फक्त लेकीला कळते.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
1. लेक असता मनाची, ……………………
……………………………., रोज समई पेटते.
2. अशी चिमणी बोलकी, …………………..
…………………………….., मग रुसून बसते.
3. फक्त लेकीला कळते, …………………….
काळ्या रात्रीला लागते, ………………………..
उत्तरः
1. लेक असता मनाची, सारी काळजी मिटते,
लेक असता घराची, रोज समई पेटते.
2. अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते,
थोडे रागावले तर, मग रुसून बसते.
3. फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा,
काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तांबडं अ. गोंदण
2. हिरवं ब. कुंदन
3. हाडाचं क. पालवी
4. झाडाची ड. चंदन

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तांबडं ब. कुंदन
2. हिरवं अ. गोंदण
3. हाडाचं ड. चंदन
4. झाडाची क. पालवी

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेकीसाठी कोणती विशेषणे वापरली आहेत?
उत्तरः
लेकीसाठी तांबडं कुंदन, हिरवं गोंदण, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी अशी विशेषणे वापरली आहेत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
लेक रुसू नये, असे कवयित्रीला का वाटते?
उत्तरः
सारे जग रुसले तरी पर्वा न करणाऱ्या कवयित्रीला आपली लेक कधी रुसू नये, असे वाटते कारण तिच्या रुसण्याने घरासही एक उदासीनता येते.

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक 5

2. एका शब्दात उत्तरे दया.

1. लेक घरात असताना काय पेटते? [ ]
2. काळ्या रात्रीला कशाची आशा लागते? [ ]
उत्तर:
1. समई
2. सकाळची

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

कविता – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40 लेक तांबडं कुंदन

लेक तांबडं कुंदन …………………….
………………. कशी सकाळची आशा.

कृती 2: आकलन कृती

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

प्रश्न 1.
1. अशी ……………… बोलकी, साऱ्या घरात हसते. (चिमणी / ताई)
2. लेक असता घराची, रोज …………………. पेटते. (चूल / समई)
3. पण आपली ……………., कधी कधी रूसू नये. (पाकळी / छकुली)
उत्तर:
1. समई
2. चिमणी
3. पाकळी

2. खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेक घरी असताना काय होते?
उत्तर:
लेक घरी असताना मनाची सारी काळजी मिटते. घरात नियमित समई पेटते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
लेकीला काय कळते?
उत्तर:
लेकीला निसर्गाची भाषा कळते.

कृती 3: काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘सारे जगही रुसले, तरी पर्वा करू नये,
पण आपली पाकळी, कधी कधी रुसू नये’.
वरील ओळींतील आशय स्पष्ट करा.
उत्तरे:
कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी ‘लेक’ या कवितेत मुलीचे घरात असणे किती आनंददायी असते हे मांडले आहे. घरातील लेकीच्या असण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात; माझ्यावर सारे जग नाराज झाले तरी चालेल, मी त्याची काळजी करणार नाही. मात्र माझी मुलगी, चिमुकल्या पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये. लेकीची माया प्रस्तुत काव्यपंक्तीतून दिसून येते.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. लेक
  2. झाड
  3. घर
  4. आस
  5. ऊर
  6. जग

उत्तर:

  1. मुलगी
  2. तरू, वृक्ष
  3. सदन, गृह
  4. इच्छा
  5. हृदय
  6. विश्व

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. लेक
  2. हाड
  3. आस
  4. चिमणी
  5. पाकळ्या

उत्तर:

  1. लेक
  2. हाडे
  3. आस
  4. चिमण्या
  5. पाकळी

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.
1. लेक
2. चिमणी
उत्तरः
1. लेक
2. चिमणा

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

विलोमपद

व्याख्या: असे वाक्य जे उलटे वाचले तरी तसेच असते, असे वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ होय.
उदा. :
1. टेप आणा आपटे
2. ती होडी जाडी होती.

लेक Summary in Marathi

काव्य परिचयः

कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी ‘लेक’ या आपल्या कवितेतून लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन केले आहे. लेकीची विविध रूपे सांगतानाच तिच्या अस्तित्वाने सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होत असल्याचे कवयित्री सांगतात. जिच्या हसण्या-रूसण्याने घरात घरपण रहाते अशा लेकीचे सुयोग्य वर्णन म्हणजे प्रस्तुत कविता होय.

Poetess Asmita Jogdand has beautifully narrated the innocence of a daughter through her poem ‘Lek’. A daughter’s presence makes a home happy, cheerful and full of life. Her existence has different shades. Daughter’s smile as well as anger, her presence make home sweet home. This poem has very aptly narrated how a daughter brings happiness to a home and how the entire house withers with her slightest of the sorrows.

कवितेचा भावार्थ:

मुलीच्या निरागसपणाचे, तिच्या घरात असण्याचे महत्त्व नमूद करताना कवयित्री म्हणतात, लेक म्हणजे जणू लाल रत्नाचा खडा, लेक म्हणजे कायम जवळ राहणारे हिरवे गोंदण, लेक म्हणजे झाडाला नुकतीच फुटलेली पालवी तर लेक म्हणजे साऱ्या घरासाठी झिजणारी, घराला सुगंधित करणारी चंदनस्वरूप सदस्य होय. लेक मनात सतत नांदत असते, तिच्या अस्तित्वाने सगळी चिंता दूर होते. लेक घरात असली की रोज समई तेवत असल्याचा भास होतो.

तिच्या असण्याने घर प्रकाशमान होते. लेक घरात नसली की मात्र तिची ओढ लागते. वेळ जागीच थांबल्याचा भास होतो, मन उदास होते. सतत चिमणीसारखी चिवचिवणारी, बोलकी लेक सगळ्या घरात हास्य पसरवते. मात्र तिच्यावर थोडे रागावताच ती रूसून बसते. सारे जग नाराज झाले तरी त्याची पर्वा करावीशी वाटत नाही. मात्र नाजूक पाकळीसारखी लेक आपल्यावर कधीच रूसू नये, असे वाटते. फक्त लेकीलाच निसर्गाची भाषा कळते. ज्याप्रमाणे काळ्या, अंधाऱ्या रात्रीला सकाळची आशा लागते, त्याप्रमाणे लेक जीवन प्रकाशमान करते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक

शब्दार्थ:

  1. लेक – मुलगी – daughter
  2. पालवी – झाडाची नुकतीच उमललेली कोवळी पाने – fresh foliage
  3. तांबडं – लाल – red
  4. गोंदण – गोंदलेले चित्र – Tattoo
  5. काळजी – चिंता – care, worry
  6. उदास – हताश, खिन्न – depressed, cheerless
  7. बोलका – भरपूर बोलणारा – talkative
  8. जग – विश्व – world
  9. आशा – उमेद – hope
  10. उर – हृदय – heart
  11. आस – इच्छा – desire
  12. कुंदन – किमती खडा – precious stone, gem
  13. उदासीनता – खिन्नता – sadness
  14. हर्ष – आनंद – happiness
  15. प्रशंसा – स्तुती – praise
  16. संमती – परवानगी – consent
  17. मौन – शांतता – silence
  18. मस्तक – डोके – head

वाक्प्रचार:

  1. आस असणे – एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होणे
  2. रुसून बसणे – रागावणे
  3. पर्वा न करणे – काळजी न करणे
  4. काळजी मिटणे – चिंता दूर होणे

Marathi Sulabhbharati Class 7 Solutions

Mothi Aai Class 6 Marathi Chapter 13 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 13 मोठी आई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 6th Marathi Chapter 13 मोठी आई Question Answer Maharashtra Board

Std 6 Marathi Chapter 13 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 13 मोठी आई Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न अ.
घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
उत्तर:
दगड, माती, विटा, चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात.

प्रश्न आ.
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
उत्तर:
चांदी, रूपे, पितळ, तांबे, कथील, दगडी कोळसा, लोखंड इ. खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात.

प्रश्न इ.
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
उत्तर:
लोखंडी खुा, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू कारखान्यात धातूपासून तयार होतात.

प्रश्न ई.
चुना कशासन तयार करतात?
उत्तर:
चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात.

प्रश्न उ.
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
उत्तर:
माणसांना प्रत्येक गोष्ट या भूमीनेच दिली आहे, म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा.

2. तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून आपणांस मिळतात, यांची यादी बनवा.

प्रश्न 1.
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून आपणांस मिळतात, यांची यादी बनवा.
उत्तर:

  1. धान्य – ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, मळा, तांदूळ इ.
  2. कडधान्य – मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, वाल, तूर, उडीद इ.
  3. पालेभाज्या – मेथी, शेपू, तांदळी, चाकवत, पालक, माठ इ.
  4. फळभाज्या – वांगी, कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, दोडका, कारले, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी, घेवडा, राजमा इ.
  5. कंदमुळे – कांदा, गाजर, बीट, मुळा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा इ.
  6. फळे – केळी, चिकू, पेरू, आंबा, फणस, अननस, द्राक्षे, सफरचंद, जांभळे, कवठ, बोरे, पपई, काजू, बदाम, अक्रोड इ.

3. आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मातृभूमी म्हणजेच जमीन, काळी आई आपणास अन्न-वस्त्र देते, दाग-दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडीकुंडी देते, पाटी-पेन्सिल देते. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. म्हणून अशा या दातृत्वपूर्ण मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा.

4. ‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधून लिहा.

प्रश्न 1.
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. भूमी
  2. जमीन
  3. भूमाता
  4. धरणीमाता
  5. मातृभूमी
  6. मायभूमी

5. पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.

प्रश्न 1.
पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
उत्तरः

  1. सोनेरूपे
  2. दागदागिने
  3. दगडमाती
  4. दूधदही
  5. गाई-म्हशी
  6. अन्न-वस्त्र
  7. चहासाखर
  8. धरणीमाता
  9. मायभूमी
  10. प्रेमभाव

6. खालील शब्दांचे समनार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समनार्थी शब्द लिहा.
उत्तर:
(अ) मातृभूमी – धरित्री, धरती, पृथ्वी
(आ) आई – माता, माय, जननी

7. हे शब्दा असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्दा असेच लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 1

8. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

प्रश्न 1.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा. साखर – ऊस
उत्तर:
(अ) फुटाणे – चणे
(आ) मनुके – द्राक्षे
(इ) भाकरी – ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी
(ई) चपाती – गहू
(उ) वेफर्स – बटाटे
(ऊ) सॉस – टोमॅटो
(ए) सरबत – कोकम, लिंबू इ.
(ऐ) चिक्की – गुळ, शेंगदाणे, तीळ.

9. खालील शब्दांचे अनेकवचन लिहा.

(अ) तुळई – तुळया
(आ) बिजागरी – बिजागऱ्या
(इ) झाड – झाडे
(ई) दागिना – दागिने
(उ) कवठ – कवठे

10. खालील तक्ता भरा.

प्रश्न 1.
खालील तक्ता भरा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 2
उत्तर:

मनुष्याचे खादय घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खादय
धान्य, कडधान्य लाकूड लोखंड पाला, पाचोळा
भाज्या लोखंड सोने गवत
फळे माती चांदी मांस
मांस, मटण चुना पितळ कडबा

11. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो ते खालील वेबमध्ये लिहा.

प्रश्न 1.
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो ते खालील वेबमध्ये लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 3

12. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 4
उत्तर:

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
1. खुर्ध्या ग्लास खुर्ध्या घागर
2. पलंग बाटली टेबल माठ
3. सुया मूर्त्या पलंग रांजण
4. टाचण्या फुलदाणी कपाट हंडी
5. चाकू आरसा खेळणी खेळणी
6. कात्र्या बरणी बैलगाडी भांडी
7. गाड्या बांगड्या नांगर कुंड्या
8. मोटारी बशी कुळव घरे
9. आगगाड्या दिवे पाट फुलदाण्या
10. विमाने घड्याळ दरवाजे बरणी

13. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.

प्रश्न 1.
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 5

14. खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

प्रश्न 1.
खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 6
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 7

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 8

15. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 9
उपक्रम: आई, मातृभूमी या विषयावरील कवितांचा संग्रह करून त्या कवितांचे वर्गात वाचन करा.
प्रकल्प: शिक्षक किंवा पालकांच्या मदतीने जवळच्या शेताला भेट दया. शेतात येणाऱ्या विविध पिकांचे निरीक्षण करून शेतातील अन्नधान्याबद्दल माहिती मिळवा.
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 10

16. खालील वाक्यांत (?, !, ‘-‘, “-“, . , ,) ही विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न अ.
आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
उत्तर:
“आवडले का तुला पुस्तक?” आई म्हणाली.

प्रश्न आ.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
उत्तर:
तो ‘प्रामाणिक’ आहे बाबांनी सांगितले.

प्रश्न इ.
गणू म्हणाला अगं आई उदया सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
उत्तरः
गणू म्हणाला, “अगं आई, उदया सुट्टी आहे, असे दिनूने सांगितले. म्हणून मी शाळेत गेलो नाही.”

प्रश्न ई.
अहाहा किती छान चित्र आहे.
उत्तर:
अहाहा! किती छान चित्र आहे!

प्रश्न उ.
तुला लाडू आवडतो भका.
उत्तर:
तुला लाडू आवडतो का?

प्रश्न ऊ.
माझे काका मुंबईला राहतात
उत्तरः
माझे काका ‘मुंबईला’ राहतात.

प्रश्न ए.
मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले
उत्तर:
मधू, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले.

Class 6 Marathi Chapter 13 मोठी आई Additional Important Questions and Answers

रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करून लिहा.

प्रश्न 1.
आपली आई आपल्यावर किती …………… करते.
उत्तर:
माया

प्रश्न 2.
तिचे नाव भूमी ! ……………!
उत्तर:
जमीन

प्रश्न 3.
माती आहे म्हणूनच आपण …….. आहोत.
उत्तर:
जिवंत

प्रश्न 4.
जेवणाच्या ताटातला प्रत्येक ………….. मोठ्या आईने दिला.
उत्तर:
जिन्नस

प्रश्न 5.
दाराच्या कड्या, तुळया व बिजागऱ्या आहेत.
उत्तर:
लोखंडी

प्रश्न 6.
त्या मोठ्या आईचे केवढे …..मानले पाहिजेत!
उत्तर:
उपकार

प्रश्न 7.
त्या भूमीतले …………….. खाऊनच आपण मोठे झालो.
उत्तर:
अन्न

प्रश्न 8.
माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या …………………
उत्तर:
भूमीनेच

प्रश्न 9.
त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी ………………….. बाळगावयास नको का?
उत्तर:
प्रेमभाव

प्रश्न 10.
पली मोठी ………………… म्हणजेच आपली मायभूमी!
उत्तर:
आई

खालील प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न 1.
आपल्या आईहूनही एक मोठी आई आहे ती कोण?
उत्तर:
आपल्या आईहूनही एक मोठी आई आहे, तिचे नाव ‘भूमी! जमीन’!

प्रश्न 2.
जमिनीत काय आहे?
उत्तर:
जमिनीत माती आहे.

प्रश्न 3.
आपण आज जिवंत कोणामुळे आहोत?
उत्तर:
माती आहे म्हणून आज आपण जिवंत आहोत.

प्रश्न 4.
जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस आपणास कोणी दिला?
उत्तर:
जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस आपणास मोठ्या आईने दिला.

प्रश्न 5.
गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात?
उत्तर:
गहू, तांदूळ व जोंधळे आपणास शेतातूनच म्हणजेच मातीतून मिळतात.

प्रश्न 6.
कापूस कोठून मिळतो?
उत्तर:
कापूस कपाशीच्या झाडापासून मिळतो.

प्रश्न 7.
रेशीम कोठून मिळते?
उत्तर:
रेशीम रेशमाच्या किड्यापासून मिळते.

प्रश्न 8.
रेशमाचे किडे कोणत्या झाडावर जगतात?
उत्तर:
रेशमाचे किडे तुतीच्या झाडावर जगतात.

प्रश्न 9.
प्रत्येक गिरणी व प्रत्येक कारखाना कशामुळे चालतो?
उत्तर:
प्रत्येक गिरणी व प्रत्येक कारखाना लोखंड व कोळसा यामुळे चालतो.

प्रश्न 10.
विटा कशापासून बनवल्या जातात?
उत्तर:
विटा लाल मातीपासून बनवल्या जातात.

प्रश्न 11.
लाकूड कोठून आणतात?
उत्तर:
मोठमोठ्या रानांतील वाळलेली प्रचंड झाडे तोडून लाकूड आणतात.

प्रश्न 12.
गाई-म्हशींपासून आपण काय मिळवतो?
उत्तर:
दूध, दही, तूप आपण गाई-म्हशींपासून मिळवतो.

प्रश्न 13.
गाई-म्हशी कशावर जगतात?
उत्तर:
गवत व कडबा यांवर गाई-म्हशी जगतात.

व्याकरण व भाषाभ्यास.

प्रश्न 1.
एक- अनेक लिहा.

  1. गोष्ट
  2. छान
  3. जिन्नस
  4. घर
  5. भूमी
  6. फूल
  7. औषध
  8. झाड
  9. कापूस
  10. रूपे
  11. दागिने
  12. उत्तर
  13. दार
  14. प्रचंड

उत्तर:

  1. कथा, कहाणी
  2. सुंदर
  3. नग, वस्तू
  4. सदन
  5. जमीन
  6. पुष्प, सुमन
  7. दवा
  8. वृक्ष, तरू
  9. कपासी
  10. चांदी
  11. अलंकार
  12. जवाब
  13. दरवाजा
  14. मोठा

प्रश्न 2.
एक – अनेक लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 10.1
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 10.2

प्रश्न 3.
पाठात आलेले जोडशब्द शोधून लिहा.
उत्तरः

  1. जिन्नस
  2. प्रचंड
  3. प्रत्येक
  4. खुर्ध्या
  5. काव्या
  6. गुंड्या
  7. तुळ्या
  8. गोष्ट
  9. उत्पन्न
  10. वस्त्र
  11. कड्या
  12. म्हशी
  13. अन्न
  14. पेन्सिल
  15. टाचण्या
  16. साऱ्या
  17. धनधान्य
  18. पाटीपेन्सिल

प्रश्न 13.
खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ करतात ते वेब मध्ये लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 10.3

लेखन विभाग

प्रश्न अ.
जमिनीच्या वर येणारी पिके यांची यादी खालील वेबमध्ये लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई 10.4

मोठी आई Summary in Marathi

काव्य परिचय:

आपल्या आईपेक्षाही आपणास अजून एक मोठी आई असते. ती म्हणजे ‘भूमी ! जमीन!’ याच आईचा मोठेपणा या पाठात लेखिकेने गायला आहे. आज आपण सर्व व आपणास जन्म देणारी आई ही सुद्धा याच आईची लेकरे आहेत. तिनेच आपणास या सर्व वस्तू पुरवल्या आहेत. ती नसती तर आपले अस्तित्वच या भूतलावर नसते आणि म्हणून त्या भूमीविषयी कृतज्ञतेची भावना आपण सतत मनात जपली पाहिजे हाच संदेश या पाठातून लेखिकेने दिला आहे.

शब्दार्थ:

  1. आई – माता,जननी (mother)
  2. माया – प्रेम, ममता (love)
  3. पोटोशी – गरोदर (pregnant)
  4. गोष्ट – कथा (story)
  5. स्वरूप – रूप (charm, beauty)
  6. जिन्नस – वस्तू (an article)
  7. भूमी – जमीन, धरित्री, धरती (Land, earth)
  8. जोंधळा – ज्वारी (jowar)
  9. पाटी – (slate)
  10. ऊस – (sugarcane)
  11. तुतीचे झाड – (murberry tree)
  12. सापडणे – मिळणे (to be found)
  13. लोखंड – लोह (iron)
  14. गिरणी – मिल (a mill)
  15. खांब – स्तंभ (a pillar)
  16. दार – दरवाजा (a door)
  17. खिडकी – झरोका (window)
  18. तुळई – घराच्या मध्यावरील लाकूड
  19. बिजागरी – सांधपट्टी (hinger)
  20. कडबा – कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग, वैरण (fodder)
  21. दागिने – अलंकार (jewellery)
  22. मायभूमी – पृथ्वी (motherland)
  23. भांडीकुंडी – छोटी मोठी भांडी (vessles and pots)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. माया करणे – प्रेम करणे.
  2. लक्षात येणे – कळणे, समजणे, ध्यानात येणे.
  3. प्रेमभाव बाळगणे – मनात प्रेम बाळगणे.

Marathi Sulabhbharati Class 6 Solutions

Aamhi Suchna Falak Vachto Class 7 Marathi Chapter 5.2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 5.2 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Textbook Questions and Answers

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?
उत्तर:
है सूचना दि. 23-9-2017 यादिवशी देण्यात आली आहे.

प्रश्न 2.
पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे ?
उत्तर:
पाणी पुरवठा 24-9-2017 या दिवशी बंद करण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 3.
पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?
उत्तर:
समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

प्रश्न 4.
पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?
उत्तर:
पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली आहे की, उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Important Additional Questions and Answers

1. सूचनाफलक

दि. 23-09-17

समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उदया आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा.

पाणीपुरवठा विभाग,
समर्थनगर.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

2. सूचनाफलक:

दि. 25-8-2018

लालबहादूर शास्त्री मार्गावरील सर्व नागरिकांना कळविण्यात येते, की आपल्या विभागातील रस्ते पावसामुळे खूपच खराब झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील दोन दिवस हा मार्ग बंद करण्यात येत आहे. तरी सर्व वाहनचालक व पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सार्वजनिक बांधकाम विभाग – लालबहादूर शास्त्री नगर ,

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही सूचना कोणत्या विभागाकडून देण्यात आली आहे?
उत्तर:
ही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रश्न 2.
ही सूचना कोणत्या मार्गावरील नागरिकांना देण्यात आली आहे?
उत्तर:
ही सूचना लालबहादूर शास्त्री मार्गावरील नागरिकांना देण्यात आली आहे.

प्रश्न 3.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग किती दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
उत्तरः
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग दि.23 व 27-08-2018 पर्यंत दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 4.
वाहनचालक व पादचाऱ्यांनी कोणत्या मार्गाचा वापर करावा?
उत्तर:
वाहनचालक व पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

3. सूचनाफलक

दि. 28-07-2018

पल्स पोलियो मोहीम आपल्या विभामातील 0 ते 5 वर्षांच्या आतील बालकांना रविवार दि. 30-7-2018 या दिवशी सकाळी 10 ते 5.00 पर्यंत पल्स पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा आपल्या विभागातील शाखेमध्ये संपर्क साधावा व आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य दयावा.

आरोग्य विभाग
महाराष्ट्र शासन

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

प्रश्न 1.
पल्स पोलिओचा डोस किती वर्षांच्या बालकांना देण्यात येणार आहे?
उत्तर:
पल्स पोलिओचा डोस 0 ते 5 वर्षाच्या बालकांना देण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 2.
पल्स पोलियो डोस कोणत्या दिवशी देण्यात येणार आहे?
उत्तरः
पल्स पोलिओ डोस रविवार दि. 30-7-2018 या दिवशी देण्यात येणार आहे.

प्रश्न 3.
पल्स पोलियोची सूचना कोणत्या विभागाकडून देण्यात आली आहे?
उत्तर:
पल्स पोलिओची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रश्न 4.
पल्स पोलिओचा डोस पाजण्यासाठी नागरिकांनी कोठे संपर्क साधावचा आहे?
उत्तर:
पल्स पोलिओचा डोस पाजण्यासाठी नागरिकांनी सरकारी – दवाखान्यात किंवा आपल्या विभागातील शाखेमध्ये संपर्क साधायचा आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

शब्दार्थ:

  1. रपेट – फेरफटका (strol)
  2. हस्तकौशल्य – हताची कला, हतोटी (manual skills)
  3. पादचारी – रस्त्याने चालणारे (pedestrian)

Marathi Sulabhbharati Class 7 Solutions

Dadas Patra Class 7 Marathi Chapter 5.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5.1 दादास पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 5.1 दादास पत्र Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 5.1 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
विदयार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
उत्तर:
जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

प्रश्न आ.
अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
उत्तर:
अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केललं आहे.’

चर्चा करा. सांगा.

  • पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.
  • पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.

माहिती मिळवूया.

माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 1

उपक्रम:
तुम्ही भेट दिलेल्या एखादया पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 2

प्रश्न 1.
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 2
उत्तर:
हळू, काही, आज, तिकडे, थोडासा, मोजके, तसा, वर, जरा, खाली, अनेक, तर.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Important Additional Questions and Answers

एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. दादाला पत्र लिहणारी – …………………….
  2. सहल कुठे गेली होती? …………………….
  3. भारतात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी – …………………….
  4. माळढोक पक्षी कोणाचा मित्र आहे? …………………….
  5. माळढोक पक्षी वर्षातून किती वेळा अंडी घालतो? …………………….
  6. माळढोक पक्ष्यांबरोबर पाहिलेले पक्षी – …………………….
  7. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी कोणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते – …………………….
  8. संतुलित’ पर्यावरणाचा अविभाज्य घटक कोणाला म्हटले आहे – …………………….
  9. अभयारण्यातून फिरताना बहिणीला कोणाची खूप आठवण आली? …………………….

उत्तरः

  1. आयेशा
  2. माळढोक अभयारण्यात
  3. माळढोक
  4. शेतकऱ्याचा
  5. वर्षातून एकदाच
  6. चंडोल, माळटिटवी
  7. वनखात्याची
  8. पक्ष्यांना
  9. दादाची

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. खूप जण मिळून एकत्र फिरायला जाणे
  2. पडक्यावर एकामागोमाग एक दाखविलेले चित्र
  3. पशू-पक्षी सुरक्षिततेसाठी असलेली जागा
  4. फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणारे साधन
  5. मनातील भावनांना, विचारांना लेखी उद्गार देणारे साधन

उत्तरः

  1. सहल
  2. चित्रफीत
  3. अभयारण्य
  4. कॅमेरा
  5. पत्र

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
‘माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे का म्हटले आहे?
उत्तर:
माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. त्यामुळे शेतातील किडे कमी होऊन पिकांचे त्यांपासून रक्षण होते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

प्रश्न 2.
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे?
उत्तर:
माळढोक पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. शिवाय त्यांची अंडी जमिनीवर असल्याने इतर प्राणी ती तुडवून जातात, त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.

प्रश्न 3.
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितलेली कोणती गोष्ट मुलांना पटली?
उत्तर:
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितले की, “पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, ङ्केवियांचं वाहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते.’

प्रश्न 4.
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त कोणाची आठवण आली व का?
उत्तर:
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त दादाची आठवण आली कारण दादालाही पक्षी खूप आवडत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
माळढोक अभयारण्यात पाहिलेले पक्षी
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 3

प्रश्न 2.
पक्ष्यांची या गोष्टीत प्रमुख भूमिका असते
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 4

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा..
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 5

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
1. माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, …………… तसेच इतर पक्षीही पाहिले.
2. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी ………… पूर्वपरवानगी घ्यावी.
उत्तर:
1. माळटिटवी
2. वनखात्याची

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
1. भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी – [ ]
2. माळढोक पक्ष्यांबरोबरच पाहिलेले इतर पक्षी – [ ]
उत्तर:
1. माळढोक
2. चंडोल, माळटिटवी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न i.
माळढोक अभयारण्य कोणत्या मार्गावर वसले आहे?
उत्तर:
माळढोक अभयारण्य सोलापूर-बार्शी मार्गावर वसले आहे

प्रश्न ii.
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी कधी होते?
उत्तर:
इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवल्यास माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
(i) सुंदर (ii) खग (iii) जंगल (iv) सखा
उत्तर:
(i) देखणी (ii) पक्षी (iii) वन (iv) मित्र

प्रश्न 2.
वचन बदला.
(i) वन (ii) गाव (iii) किडे (iv) पक्षी
उत्तर:
(i) वने (ii) गावे (iii) किडा (iv) पक्षी

प्रश्न 3.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.

प्रश्न i.
सहलिच्या दिवसी आम्ही पहाटेच निघालो.
उत्तर:
सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो.

प्रश्न ii.
माळढोक पक्षी शेतकरयाचा मीत्र आहे.
उत्तर:
माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
निसर्ग हा सजीव व निर्जीव घटकांनी बनला आहे. यातील ङ्केप्रत्येक पटकांचा आकार, रंग, गुण हे वैशिष्टयपूर्ण असतात. पक्षीसुद्धा निसर्गाच्या या अविभाज्य घटकांपैकीच एक आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीत ते कुणाचे तरी भक्ष्य बनत असतात तर कुणाचे तरी ते भक्षक बनत असतात. अन्नसाखळीतील त्यांच्या या भूमिकेमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो.

प्रश्न 2.
पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर:
आजकाल निसर्गातील अनपेक्षित व अनिष्ट बदलांचा परिणाम प्राणीजीवनाबरोबरच पक्ष्यांवरही होताना दिसतो. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता व त्याच वेगाने निर्माण होणारी पाण्याची कमतरता यांमुळे पक्षांचे जीवन संकटात सापडले आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर पक्षी अभयारण्ये उभारण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ, तसेच मनुष्यवस्ती असलेल्या भागांत त्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करू.

त्याचबरोबर पक्ष्यांचे जीवन सुसहर होण्यासाठी वृक्षलागवडीसारखे उपक्रम हाती घेऊ. एवढेच नाही तर ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रजातींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर त्यांच्या शिकारीस व हत्येस प्रतिबंध करू.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

व्याकरण व भाषाभ्यास

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 6
उत्तरः

  1. मित्र × शत्रू
  2. संतुलित × असंतुलित
  3. काल × आज
  4. देखणा × कुरूप

प्रश्न 2.
खालील वाक्यांतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखा.
1. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता.
2. अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली
उत्तर:

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
1.  पक्षी मी देखणा नव्हता
2. अभयारण्य मला, तुझी खूप आली

प्रश्न 3.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. घोषित करणे – क्रिकेटच्या संघाचा संघप्रमुख म्हणून माझे नाव घोषित करण्यात आले.
2. निरखून बघणे – मी झाडावरील पक्ष्याला त्याचे घरटे बांधताना निरखून बघत होतो.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र 7
उत्तरः
एकदा, मजेशीर, तेथून, लगबगीने, मुळीच, तसाच, जरा, मागे, आता, पुढे.

खालील वाक्ये शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
दादा, आम्ही हा माळढोक पक्षी जवळुन नीरखून बघीतला.
उत्तर:
दादा आम्ही ह्य माळढोक पक्षी जवळून निरखून बघितला.
उदा.

  1. जाता-येता
  2. चार-पाच
  3. कधी-कधी

खालील वाक्यांत संयोग चिन्हाचा वापर करा. उदा.

प्रश्न 1.
कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थांनी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा’ करावा रोज दोन तीन तास वाचन करावे.
उत्तरः
कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थ्यां नी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा करावा. रोज दोन-तीन तास वाचन करावे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

लेखन विभाग

प्रश्न 1.
माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची । संवादाची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची / संवादाची देवाणघेवाण करतात, त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
उत्तर:

एकतर्फी माहीतीची/ संवादाची साधने दुतर्फी माहितीची संवादाची साधने
फॅक्स, पत्र, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, जाहिरात, भाषण ई-मेल, मोबाइल, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, संभाषण

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

प्रश्न 2.
चर्चा करा, सांगा व लिहा.
उत्तर:
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, या विषयी पालकांसोबत चर्चा करा.

  • आई : राधिका त्या चिमणीसाठी भांड्यात थोडे पाणी ठेव पाहू.
  • राधिका : मी नाही.
  • आई : राधिका या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही खूप तहान लागते.
  • राधिका : मला का सांगते? ती का माझी मैत्रिण आहे?
  • आई : राधिका, पक्षी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.
  • राधिका : सांग पाहू कसे ते?
  • आई : पक्षी आपण टाकून दिलेल्या फळांच्या बिया खातात, व त्यांच्या विष्ठेतून त्या बाहेर पडतात. त्यातूनच काही बिया रूजतात व झाडे उगवतात.
  • राधिका : खरचं आई?
  • आई : होय! जंगलात झाडे लावायला आपण जातो का?
  • राधिका : नाही?
  • आई : ती सर्व झाडे पक्ष्यांमुळेच उगवतात. आपल्या आजूबाजूला जी बडा-पिंपळाची झाडे दिसतात ना, ती ही तशाच प्रकारे उगवली आहेत.
  • राधिका : आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. अजून पक्षी कोणते काम करतात?
  • आई : पक्षी मेलेले उंदीर किंवा इतर नको असलेला कचरा किंवा छोट्या किटकांना खातात. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो व पर्यावरण संतुलित राहायला मदत होते.
  • राधिका : आई मी माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पक्ष्यांची काळजी घ्यायला सांगेन.

प्रश्न 3.
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या विषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.
उत्तर:
सुवर्णा : अरे राज, तू चिमणी पाहिली आहेस का?
राज : दोन-तीन वर्षांपूर्वी मी एक चिमणी पाहिली होती, पण हल्ली चिमण्या कुठेच दिसत नाहीत.
सुवर्णा : याचे काय कारण आहे हे तुला माहीत आहे का?
राज : नाही
सुवर्णा : थांब मी तुला सांगते. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पण तू बोलव! (सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येतात.) आपल्याला सर्वांना पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल. यावर चर्चा करावयाची आहे. तर मग सांगा पाहू. (एकेक जण सांगू लागतात.) (1) आपण सर्वांत प्रथम झाडांची संख्या वाढवली पाहिजे. (2) पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली पाहिजे. (3) त्यांची घरटी सुरक्षित राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे. (4) काहीजण पक्ष्यांची अंडी दुष्टपणे फोडून टाकतात ती वाचवली पाहिजेत.

(5) पक्ष्यांसाठी कृत्रिम घरे तयार करायला पाहिजेत. (6) पक्षी ओल्या कचऱ्याबरोबर कधीतरी प्लॅस्टिक पण खातात. यासाठी ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. (7) पक्षी झाडांकडे आकर्षित होतील अशा हिरव्यागार झाडांची संख्या वाढविली पाहिजे. (8) पक्ष्याना त्रास होणार नाही यासाठी मोठमोठ्या ध्वनिक्षेपकांचा आवाज टाळला पाहिजे. (9) फटाके उडविताना त्यांचा मोठा आवाज होतो त्यामुळे पक्षी घाबरतात, यासाठी आवाजविरहीत फटाके वाजविले पाहिजेत. (10) पक्ष्यांसाठी अन्नधान्य शेतात व इतर ठिकाणी राखून ठेवले पाहिजे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

प्रश्न 4.
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला : मैत्रिणीला लिहा.
उत्तर:
॥श्री ।।

अ.ब. क.
सुयश अपार्टमेंट,
गांधी मार्ग, मधली आळी,
पनवेल 400805
दि.10 जुन 2018

प्रिय मित्र सुनिल यास,
सप्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले. यावेळी मे महिन्यात आई बाबांबरोबर मी महाबळेश्वरला गेलो होतो. त्यामुळे तुला पत्र लिहू शकलो नाही.

महाबळेश्वर हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. अरे तिथले वातावरण तर खूपच सुंदर आहे. आम्ही तिचे सनसेट पॉईंटला गेलो होतो. तिथे इतका जोराचा वारा येतो की मला क्षणभर वाटले की मी ही वाऱ्याबरोबर उडून जातो की काय?

तसेच तेथे घोड्यावर रपेटही मारली. बोटींग केले. शेतातून काढलेली ताजी टवटवीत स्ट्रॉबेरीही आम्हांला खायला मिळाली.

तेथील बाजारात किती तरी हस्तकौशल्याच्या वस्तूही बघायला मिळाल्या. तेथील निसर्गरम्य वातावरणातून परत येण्याची इच्छाच होत नव्हती; पण काय करणार यावेच लागले. माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. तुझी खुशाली वरचेवर कळव.

तूबै एकदा महाबळेश्वरला जाऊन ये. तुझ्या आई बाबांना माझा शि. सा. नमस्कार. बाकी सर्व ठीक आहे.

तुझा मित्र.
अ. ब. क.

दादास पत्र Summary in Marathi

पाठ परिचय :

पत्र हे दोन व्यक्ती/संस्था यांच्यामधील वैचारिक, भावनिक देवाणघेवाण, संबंध आणि संवाद प्रस्थापित करणारे प्रभावी माध्यम आहे. मनातील भावनांना, विचारांना वाट करून देणारे ते साधन. संगणकाच्या व मोबाइलच्या जगात पत्र लिहिणे माणसे विसरूनच गेली आहेत. ‘दादास पत्र’ या पाठात बहिणीने आपल्या भावाला पत्राद्वारे सहलीला केलेल्या गमती व खुशाली कळविली आहे.

A letter is a strong medium of communication between two people or institutions to share ideologies, emotions, relationships and dialogues. It gives way to express one’s emotions or thoughts. In the world of computers and mobiles, people have forgotten to write letters. In ‘Dadas Patra’, a sister has written about her cherished memories of a picnic to her brother through a letter.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

शब्दार्थ :

  1. सहल – पर्यटन, फेरफटका – a picnic
  2. चित्रफीत – सिनेमा – acinema/film
  3. हट्ट – कळकळीची विनवणी – insistence
  4. देखण्या – मोहक, सुंदर – charming
  5. तुडवणे – पायाखाली चिरडणे – to crush under feet
  6. पूर्व परवानगी – आगाऊ अनुमती, – prior permission
  7. संमती संतुलित – समतोल – balance
  8. पर्यावरण – अवतीभवतीची सजीव-निर्जीव सृष्टी – environment
  9. प्रदूषण – अशुद्धता – pollution
  10. पटणे – खात्री होणे – to be convinced
  11. अविस्मरणीय – न विसरण्यासारखे – unforgettable
  12. खुशाली – निरोगी व सुखी स्थिती – health and happiness
  13. संतुलित – संतुलन राखलेले (Balanced)
  14. अविभाज्य – विभागले न जाणारे (Integral)
  15. वनविभाग (वनखाते) – अरण्यांची देखभाल करणारे खाते (forest department)
  16. वहन – वाहून नेण्याची क्रिया (carrying)
  17. पाठपुरवठा करणे – सतत मागे रहाणे/लागणे (persuance)
  18. एकतर्फी – एका बाजूने (one way)
  19. दुतर्फी – दोन्ही बाजूने (both way)
  20. ध्वनिक्षेपक – speakers

वाक्प्रचार :

  1. नष्ट होणे – नाहीसा होणे
  2. घोषित करणे – जाहीर करणे
  3. गुजराण करणे – निर्वाह करणे
  4. निरखून पाहणे – बारकाईने निरीक्षण करणे

टिपा :

  • चंडोल पक्षी – चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी फार सुंदर गातो. त्यांची पिसे तपकिरी, राखाडी, वाळूसारखी काळी व पांढरी अशा विविध रंगाची असतात. मोकळ्या मैदानात व चराऊ गवताळ प्रदेशात त्यांचे वास्तव्य आढळते.
  • माळटिटवी पक्षी – तितराइतका आकार असणाऱ्या या पक्ष्याचे पाय लांब तर पोट पांढरे व डोळे काळे असते. यास पिवळ्या गाठीची टिटवी असे म्हणतात. पडीक शेतीचा प्रदेश व धान्याची कापलेली शेते याठिकाणी हे पक्षी वास्तव्य करतात.
  • माळढोक अभयारण्य – ‘जवाहरलाल नेहरू माळढोक अभयारण्य’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभयारण्याची स्थापना सन 1979 मध्ये झाली. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागावर हे वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ 8496 चौ.कि.मी. इतके आहे.

Marathi Sulabhbharati Class 7 Solutions

Amhi Jahirat Vachato Class 7 Marathi Chapter 7.3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 7.3 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Textbook Questions and Answers

1. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
उत्तर:
ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे.

प्रश्न 2.
कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
उत्तरः
15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

प्रश्न 3.
पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्टे सांगा?
उत्तरः
पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:

  1. छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन
  2. नामवंत साहित्यिकांची पुस्तके
  3. विविध विषयांवरील पुस्तके
  4. मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके.
  5. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी

प्रश्न 4.
प्रदर्शन कोठे भरणार आहे?
उत्तर:
प्रदर्शन शारदा विदयालयाच्या सभागृहात भरणार आहे.

प्रश्न 5.
खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
उत्तरः
पुस्तक खरेदीवर 20% सवलत मिळणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

प्रश्न 6.
पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा?
उत्तर:
पुस्तक प्रदर्शनात गोष्टींची पुस्तके, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकतील.

2. ओळखा पाहू!

प्रश्न 1.

  1. हात आहेत; पण हालवत नाही. [ ]
  2. पाय आहेत; पण चालत नाही. [ ]
  3. दात आहेत; पण चावत नाही. [ ]
  4. नाक आहे; पण श्वास घेत नाही. [ ]
  5. केस आहेत; पण कधी विंचरत नाही. [ ]

उत्तरः

  1. खुर्ची
  2. टेबल
  3. कंगवा
  4. सुई
  5. ब्रश

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Important Additional Questions and Answers

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही जाहिरात कशा संदर्भात आहे?
उत्तर:
ही जाहिरात ‘गुडविल व्यायामशाळेच्या’ संदर्भात आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

प्रश्न 2.
या व्यायामशाळेसाठी केव्हापासून प्रवेश सुरू होणार आहेत?
उत्तर :
या व्यायामशाळेसाठी 10 मे पासून प्रवेश सुरू होणार आहेत.

प्रश्न 3.
या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर:
या व्यायाम शाळेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • तज्ज्ञ प्रशिक्षक
  • माफक फी
  • लहान मुले व वृद्धांना विशेष सवलत
  • मोफत पार्किंगची सोय
  • अत्याधुनिक व्यायामाची साधने

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

प्रश्न 4.
पहिल्या शंभर सभासदांना किती टक्के विशेष सवलत मिळणार आहे?
उत्तरः
पहिल्या शंभर सभासदांना 10 टक्के विशेष सवलत मिळणार आहे.

प्रश्न 5.
या व्यायामशाळेची वेळ काय आहे?
उत्तर:
या व्यायामशाळेची वेळ सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 10 ही आहे.

प्रश्न 6.
‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन कशावर नियंत्रण आणायचे आहे?
उत्तर :
‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन चरबीवर नियंत्रण आणायचे आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

शब्दार्थ :

  1. दालन – मोठी खोली, सदनिका (apartment)
  2. नामवंत – नावाजलेले (famous by name)
  3. वार्तालाप – संवाद (conversation)
  4. नियंत्रण – संयमन, ताब्यात ठेवणे (control)
  5. सुडौल – बांधेसुद (shapely)
  6. तज्ज्ञ – निष्णात (expert)

Marathi Sulabhbharati Class 7 Solutions

Panpoi Class 6 Marathi Chapter 17 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 17 पाणपोई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 6th Marathi Chapter 17 पाणपोई Question Answer Maharashtra Board

Std 6 Marathi Chapter 17 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 17 पाणपोई Textbook Questions and Answers

1. एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
उत्तर:
उन्हामुळे अंगाची लाही लाही होते.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 2.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
उत्तर:
अवखळ वारा सुटल्यावर पालापाचोळा धुळीबरोबर उडतो.

प्रश्न 3.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
उत्तर:
रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.

प्रश्न 4.
पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?
उत्तर:
पाणपोईवर पाणी पिण्यास गरीब श्रीमंत दोन्हीही येतात.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 5.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
उत्तर:
रखरखत्या उन्हात रांजणातले थंडगार पाणी पिऊन सर्व तृप्त होतात म्हणून त्याला आशीर्वाद देतात.

2. उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

प्रश्न 1.
उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

3. घामेजणे, लाहीलाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमुहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

प्रश्न 1.
घामेजणे, लाहीलाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमुहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
उत्तर:
उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखते ऊन होते. मामाच्या शेतावर जायचे होते. अंगाची लाहीलाही होत होती. आम्ही घामेजलो होतो. उष्णगरम झळाई लागत होती. घसा कोरडा पडला होता. तहान लागली होती. जवळच्या झऱ्यातून थंडगार गोड पाणी प्यायलो. मन तृप्त झाले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

4. रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा.

प्रश्न 1.
रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा.
उत्तर:

  1. लाहीलाही
  2. सारखीसारखी
  3. झरझर
  4. भरभर
  5. पटपट

5. पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.

पाणबुड्या, पाणलोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

6. ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 1

7. खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर:

  1. गार × गरम
  2. रंक × राव
  3. ऊन × सावली
  4. तृप्त × अतृप्त
  5. दुवा × शाप
  6. सज्जन × दुर्जन

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

8. तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.

प्रश्न 1.
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
उत्तर:
डांबरी रस्त्यावरून चालताना उष्णतेच्या झळा लागत होत्या. थंडगार पाणी प्यावेसे वाटत होते आणि अचानक एक पाणपोई दिसली. माझ्या मनात विचार येतील की ही पाणपोई कोणी ठेवली असेल? त्या सज्जन माणसास मला भेटता येईल का? हे पाणी थंडगार कसे राहते? लाल फडके कोण बांधून जाते? त्या सज्जनाचे मला आभार मानता येतील का? इत्यादी.

9. चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.

प्रश्न 1.
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
उत्तर:
मे महिन्याची दुपार होती. वाटसरू दुसऱ्या गावाला जायला निघाला. जवळ पाणीही नव्हते. रखरखत्या उन्हात चालवत नव्हते. ग्लानी येत होती. कडक ऊन होते. थोडे पुढे जाऊन पहातो तो काय एका मोठ्या वृक्षाखाली पाणपोई दिसली. मनाला खूप बरे वाटले. ज्यानी कोणी ती पाणपोई ठेवली होती त्याला खूप दुवा दिला. समाजसेवेची ही पद्धत किती न्यारी आहे असे वाटले. तहान शमली. तृप्तता झाली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

10. तुमच्या गावातील एखादया पाणपोईवर जा. तीकोणी काढली, ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ती एक मोठी समाजसेवा कशी आहे, याबद्दल सात-आठ ओळी लिहा.
उत्तर:
राजापूर आमचे गाव. उन्हाळा सुरू झाला की गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती व त्यांचा तरूण मुलगा मोठ्या झाडाच्या पारावर सुंदर मोठे काळे माठ आणतात. त्यात स्वच्छ गोड पाणी भरतात. त्या माठाला ओले लाल फडके बांधतात. त्यामुळे माठातील पाणी थंडगार रहाते. वाटसरूंना, तहानलेल्यांना एवढ्या प्रचंड उष्णतेत गार पाणी मिळावे व त्यांची तहान शमावी हा त्यामागील उद्देश. वाटसरूने पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या डावानेच पाणी घ्यायचे हा दंडक असतो.

त्यात उष्टे भांडे किंवा हात बुडवता येत नाही. हे रांजण नीट झाकलेले असते. केरकचरा त्यात जात नाही. गाळलेले नळाचे पाणी यात भरले जाते. ते जंतुविरहीत असते. ‘तहान शमविण्यासाठी’ स्वेच्छेने केलेली ही सेवा म्हणजे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. यातून ‘परोपकार’ हा मुख्य उद्देश दिसून येतो. आपणासही यातून शिकण्यासारखे आहे. घरातील गॅलरीत व खिडकीबाहेर पक्ष्यांनाही दाणा पाण्याची सोय करता येते. करून तर पहा!

विचार करून सांगा !

प्रश्न 1.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.

प्रश्न 2.
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
उत्तरः
कोणताही उपक्रम हा समाजाच्या हितासाठी असेल तर घरातील मोठ्या माणसांना निश्चितच आनंद होतो. ते देखील तुमची योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतात. कमी खर्चात योग्य काम कसे होईल हे शिकवितात. त्यासाठी लागणारी शिस्त, नियोजनाचे धडे देतात. म्हणून मोठया माणसांना सांगणे आवश्यक आहे असे मला वाटतेय.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 3.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.

प्रश्न 4.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 2

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 6.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.

प्रश्न 7.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-‘) घाला व उतारा पुन्हा लिहा.

प्रश्न 8.
इयत्ता पाचवीमध्ये तुमचा शब्दसंग्रह तुम्ही तयार केला आहे. शब्दसंग्रह किंवा शब्दकोश कसा पाहावा हे आपण पाहूया.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 3

प्रश्न 9.
वर दिलेले ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील शब्द वाचा.
‘अ’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले नाहीत.
मात्र ‘ब’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले आहेत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 10.
पाठ्यपुस्तकातील पाठ 2 आणि पाठ 3 मधील शब्दार्थ खालील चौकटीत दिले आहेत.

प्रश्न 11.
पाठ्यपुस्तकातील पाठ 2 आणि पाठ 3 मधील शब्दार्थ शब्दकोशाप्रमाणे खालील चौकटीत दिले आहेत.

‘अ’ गट

लुकलुकणे-चमकणे.
तल्लीन होणे-दंग होणे, गुंग होणे.
कडकडून भेटणे-प्रेमाने मिठी मारणे.
बिलगणे-प्रेमाने जवळ येणे.
गहिवरून येणे-मन भरून येणे.
धमाल-मजा.
पाडाचा आंबा-अर्धवट पिकलेला आंबा.
आमराई-आंब्याच्या झाडांची बाग.
ऐन दुपारी- भर दुपारी.
भणाण वारा – वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज.
खचणे-खाली खाली जाणे, ढासळणे.
चडफड- राग,
गिल्ला करणे-गोंधळ करणे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

‘ब’ गट

आमराई-आंब्याच्या झाडांची बाग,
ऐन दुपारी- भर दुपारी.
कडकडून भेटणे-प्रेमाने मिठी मारणे.
खचणे- खाली खाली येणे, ढासळणे.
गहिवरून येणे-मन भरून येणे.
गिल्ला करणे-गोंधळ करणे.
चडफड- राग.
तल्लीन होणे-दंग होणे, गुंग होणे.
धमाल-मजा.
पाडाचा आंबा-अर्धवट पिकलेला आंबा.
बिलगणे-प्रेमाने जवळ येणे.
भणाण वारा – वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज.
लुकलुकणे-चमकणे.

आले का लक्षात?

‘क, ख ….. ज्ञ’ या अक्षरांच्या क्रमानुसार व बाराखडीतील चिन्हानुसार वरील शब्द लिहिले आहेत. शब्दकोश पाहताना याच पद्धतीने पाहा. पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्येतर साहित्यातील शब्दांचे अर्थ पाहताना या पद्धतीने शब्दकोश पाहा. पाठ्यपुस्तकातील इतर पाठांमध्ये आलेले शब्दार्थ पाहा व शब्दकोशाप्रमाणे लिहून अधिकचा सराव करा.

Class 6 Marathi Chapter 17 पाणपोई Additional Important Questions and Answers

योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
उन्हाने अंगाची ……………. होते. (लाहीलाही / आग)
उत्तर:
लाहीलाही

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 2.
…………….. सावलीत पाणपोई थाटली आहे. (आंब्याच्या / वटवृक्षाच्या)
उत्तर:
वटवृक्षाच्या

प्रश्न 3.
रखरखत्या उन्हात …………….. वारा सुटला आहे. (उष्णगरम / अवखळ)
उत्तर:
अवखळ

प्रश्न 4.
पाणी पिण्यास ……………… ठेवतात. (रांजण / माठ)
उत्तर:
रांजण

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 5.
पाणी पिऊन ………………. दुवा देतात. (लोकांना / सज्जनास)
उत्तर:
सज्जनास

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
रांजण कसे होते?
उत्तर:
रांजण गार पाण्याने भरलेले व लाल कापडाने झाकलेले होते.

प्रश्न 2.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
उत्तर:

  1. ……………. होतीया लाहीलाही.
  2. आठवते दग्ध ………………….
  3. …………………. अवखळ वारा.
  4. …………………. उंच अंबरा.
  5. …………………. मोठी तहान.
  6. ‘रंक असो ………………….
  7. धन्य असो ………………….
  8. पिऊनीया ………………….

उत्तरः

  1. उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाहीलाही.
  2. आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई.
  3. रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा.
  4. धुळीसंगे पालापाचोळा जाई या उंच अंबरा.
  5. सारखीसारखी लागते साऱ्यांना मोठी तहान.
  6. ‘रंक असो वा राव,’ हे पाणी पितात सारेजण!
  7. धन्य असो ज्याने थाटिली ही पाणपोई उन्हात.
  8. पिऊनीया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

व्याकरण व भाषाभ्यास

विशेषण:
नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात.
उदा. सुंदर, कोवळे, लहान, लुसलुशीत, कडक, गोजिरवाणे इ.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

 नाम विशेषण
1. ताजमहाल अ. नरम
2. वारा ब. थंडगार
3. बर्फ क. कडक
4. लाकूड ड. सोसाट्याचा
5. कापूस इ. सुंदर

उत्तर:

नाम विशेषण
1. ताजमहाल इ. सुंदर
2. वारा ड. सोसाट्याचा
3. बर्फ ब. थंडगार
4. लाकूड क. कडक
5. कापूस अ. नरम

प्रश्न 2.
‘वारा’ या शब्दाला विशेषणे लावा..
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 4

प्रश्न 3.
एकाच अर्थाचे शब्द शोधा. जसे की – उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा.
उत्तर:

  1. केरकचरा
  2. गोरागोमटा
  3. गरमागरम
  4. घनदाट
  5. काळाकभिन्न

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 4.
संबंधित शब्द लिहा.
उत्तर:

  1. पाणपोई – पाणबुड्या, पाणबोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती
  2. जलचर – जलविद्युत, जलसाठा, जलसमाधी, जलाशय, जलसंपत्ती, जलधी

प्रश्न 6.
खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर:

  1. थाटणे × मोडणे
  2. आठवणे × विसरणे
  3. थकलेला × ताजातवाना
  4. मोठी × लहान
  5. भरलेले × रिकामे
  6. झाकणे × उघडणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
अंगाची लाहीलाही होणे – उन्हामुळे अंगाची आग होणे.
उत्तर:
वैशाख महिन्यात अंगाची लाहीलाही होते.

प्रश्न 2.
तृप्त होणे – समाधानी होणे.
उत्तर:
भुकेलेला भिकारी भाजीभाकरी खाऊन तृप्त झाला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

विचार करून सांगा !

प्रश्न 1.
कोणकोणते सामाजिक उपक्रम करावेत असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
उत्तरः
1. जलसाक्षरता अभियान राबवणे – पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. पाण्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे सिंचन, नियोजन, वापर अतिशय काळजीपूर्वक करण्यासाठी खेडोपाडी, शहरातून जलसाक्षरता शिबीरे घ्यायला हवी.

2. तंत्रज्ञान साक्षरता – आजच्या तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात दररोज नवनवीन बदल घडत आहेत. त्याला सामोरे
जाण्यासाठी संगणक, टॅब, मोबाईलची ओळख व त्यात कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी वृद्धांचे व जिज्ञासूंचे तंत्रज्ञान साक्षरता वर्ग मोफत घेतले पाहिजे. त्यामुळे संभाव्य अडचणींवर ते मात करू शकतील. उदा. रांगेत उभे न राहता एखादया वृद्ध व्यक्तिला ऑनलाईन बुकींग कसे करतात ते शिकविणे.

पाणपोई Summary in Marathi

काव्यपरिचयः
‘पाणपोई’ या कवितेत उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना, रखरखते ऊन असताना वाटसरूंना ग्लानी येते व पाणी हवेहवेसे वाटते. तर त्या ठिकाणी स्वच्छ, थंडगार पाणी प्यायला मिळाले तर अत्यंत तृप्तता मिळते. वाटसरूंना पाणी पिण्यासाठी केलेली सोय म्हणजेच पाणपोई. भूतदयेचे हे उत्तम उदाहरण आहे.

शब्दार्थ:

  1. दग्ध ऊन – भाजणारे ऊन (burning heat)
  2. वाटवृक्ष – वडाचे झाड (Banyan tree)
  3. पाणपोई – उन्हाळ्यामध्ये वाटसरूंसाठी केलेली पिण्याच्या पाण्याची सोय (stand to supply water to travellers)
  4. अवखळ – खोडकर (naughty, mischevous)
  5. थकलेला – दमलेला (tired)
  6. ग्लानी – चक्कर, सुस्ती (ennui, fatigue)
  7. रांजण – मोठे माठ (big earthen pot)
  8. तृप्त – संतुष्ट (satisfied)
  9. रंक – गरीब (poor)
  10. राव – श्रीमंत (rich)

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

वाक्प्रचार व अर्थ:

  1. अंगाची लाही लाही होणे – उन्हामुळे अंगाची आग होणे.
  2. तृप्त होणे – समाधानी होणे.

Marathi Sulabhbharati Class 6 Solutions

Shyamche Bandhuprem Class 7 Marathi Chapter 2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 2 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उत्तरः
नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा रम्य सुंदर वास सुटत असतो.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न आ.
श्यामने कोणता निश्चय केला होता?
उत्तरः
गणेश चतुर्थीस गावाला जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असा निश्चय श्यामने केला होता.

प्रश्न इ.
लहान भावाला आईने कसे समजावले?
उत्तरः
एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता, त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.

प्रश्न ई.
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
उत्तरः
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट-कचेरीच्या कामासाठी जात असत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न उ.
श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
उत्तरः
आपल्या लहान भावासाठी शिवलेला नवीन कोट कधी एकदा भावाला देतो, असे श्यामला झाले होते. श्यामच्या हृदयात प्रेमपूर आला होता. सुखस्वप्नात तो दंग होता. त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.

2. खालील आकृत्या पूर्ण करा. 

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 1
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 3

प्रश्न आ.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 2
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 4

3. का ते लिहा.

प्रश्न अ.
श्यामचे डोळे अणूंनी न्हाले होते.
उत्तर:
श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अधूंनी न्हाले होते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न आ.
श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला ‘जाऊ नको’ असे म्हटले.
उत्तर:
पावसापाण्याचे दिवस होते. नदीनाल्यांना पूर आले होते. पिसईचा पया, सोंडेघरचा पया यांना उतार नव्हते, यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले.

प्रश्न इ.
पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता.
उत्तर:
जोराचा पाऊस पडत होता. त्याच्या पाण्याला खूप जोर होता, त्यामुळे पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता.

प्रश्न ई.
श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
उत्तर:
श्यामची आई त्यांच्या लहान भावाला नेहमी म्हणत असे, “तुझे अण्णा, दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील”. त्याप्रमाणे श्यामने स्वत:च्या खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता म्हणून श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

चर्चा करा. सांगा.

‘पंख असते तर एकदम उडून गेलो असतो’ यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

खेळूया शब्दांशी.

(अ) खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती
दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे.

(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.

  1. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.
  2. मी, सातपुते, त्याने, तिला.
  3.  हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य.
  4. लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.

उत्तर:

  1. त्यांनी – ‘त्यांनी’ हे सर्वनाम आहे व इतर सर्व विशेष नामे आहेत.
  2. सातपुते – ‘सातपुते’ हे विशेष नाम आहे. इतर सर्व सर्वनामे आहेत.
  3. हिमालय – ‘हिमालय’ हे विशेष नाम आहे. बाकी सर्व भाववाचक नामे आहेत.
  4. आम्ही – ‘आम्ही’ हे सर्वनाम आहे. बाकी सर्व क्रियापदे आहेत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

लिहिते होऊया.

प्रश्न 1.
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
उत्तर:
आम्ही आमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी वाढदिवसाला पुस्तक देतो. भेटकार्ड देतो. एखादे चांगले काम केले की चॉकलेट देतो. अभ्यासात चांगले गुण मिळाले की एखादे चित्र भेट म्हणून देतो.

 

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 5
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 8

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Important Additional Questions and Answers

खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्ये पुन्हा लिहा.

  1. तप्त जमिनीला …………. शांतवू लागले.
  2. थंडीच्या दिवसांत ……………. चौघडी’ करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे.
  3. एक ……………. माझ्या पायाजवळून उडी मारून गेली.
  4. पिसईचा पह्या ……………….. भरून वाहत होता.
  5. ……………. दगड पायांना खुपत होते; परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते.
  6. त्या ………………. नाचातून मी चाललो होतो.
  7. वडील ……………… करत होते व आईने शेगडीत ………………. शेकण्यासाठी दिले होते.
  8. ”……………. पह्याला पाणी नव्हते का रे?”
  9. या प्रेमावर कोणाची ……………. नको पडायला.

उत्तर:

  1. मेष
  2. धोतर
  3. नानेटी
  4. दुथडी
  5. सुयांसारखे
  6. पंचमहाभूतांच्या
  7. संध्या, निखारे
  8. सोंडेघरच्या
  9. दृष्टी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

असे कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
“तुझे अण्णा – दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.”
उत्तर:
श्यामची आई आपल्या लहान मुलाला (पुरुषोत्तमला)
म्हणाली.

प्रश्न 2.
“इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?”
उत्तर:
श्यामची आई श्यामला म्हणाली.

प्रश्न 3.
“सोंडेघरच्या पल्याला पाणी नव्हते का रे?”
उत्तर:
श्यामचे वडील श्यामला म्हणाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 4.
“हो परंतु मी आलो कसातरी!”
उत्तर:
श्याम वडिलांना म्हणाला.

प्रश्न 5.
“हा नवीन कोट कोणाला रे?”
उत्तर:
श्यामचा धाकटा भाऊ श्यामला म्हणाला.

प्रश्न 6.
“कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?”
उत्तर:
श्यामची आई श्यामला म्हणाली.

प्रश्न 7.
“आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत.”
उत्तर:
श्याम त्याच्या आईला म्हणाला.

प्रश्न 8.
“मग उधार का शिवून आणलास, श्याम?”
उत्तरः
श्यामचे वडील श्यामला म्हणाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आईने श्यामला कातर’ स्वरात काय विचारले?
उत्तर:
आईने श्यामला कातर स्वरात विचारले की, “श्याम कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?”

प्रश्न 2.
श्यामने नवीन कोट शिवण्यासाठी काय केले?
उत्तर:
वडीलांनी खाऊसाठी दिलेले आणा-दोन आणे खाऊसाठी खर्च न करता, दोन-तीन महिने ते जमवून श्यामने त्या पैशांचा पुरुषोत्तमला नवीन कोट शिवला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

शब्दार्थ:

  1. चौघडी – चार घड्या (four folded)
  2. पहया – ओढा (stream)
  3. कातर – कापरा, थरथरणारा (trembling)

खालील आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
श्याम भावंडास काय आणू शकत नव्हता?
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 6

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 7
उत्तरः

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.

  1. ………………. डोळे होते.
  2. हृदयात ………….” आला होता.
  3. …………… नवीन कपडे करतात.

उत्तर:

  1. ध्येयावर
  2. प्रेमपूर
  3. गौरी-गणपतीत

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.

  1. श्याम रोज मोजत असलेले[ ]
  2. श्याम हयास भीक घालणार नव्हता [ ]

उत्तर:

  1. पैसे
  2. नदीनाल्यास

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
श्याम शिंप्याकडे मापासाठी कोणाला बरोबर घेऊन गेला?
उत्तर:
श्याम शिंप्याकडे मापासाठी आपल्या भावाच्या वयाच्या एका मुलाला बरोबर घेऊन गेला

प्रश्न 2.
श्यामने कोटासाठी किती कापड व किती अस्तर घेतले?
उत्तर:
श्यामने कोटासाठी दोन वार कापड व अर्धा वार अस्तर घेतले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. सुट्टी
  2. कोट
  3. नाले
  4. खिसा

उत्तर:

  1. सुट्ट्या
  2. कोट
  3. नाला
  4. खिसे

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये शोधा व त्यांचे प्रकार सांगा.

प्रश्न 1.
रोज पैसे मोजत होतो.
उत्तर:
रोज – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही पैसे साठवता का? साठवलेल्या पैशांचा उपयोग कशासाठी करण्याची तुमची इच्छा आहे?
उत्तर:
मला प्रथम पैसे साठवण्याची सवय नव्हती. पण आजीने छोटीशी पिगी बैंक आणून देताच मला त्यात पैसे साठवण्याची सवय जडली. त्यात आवश्यक तेवढे पैसे जमताच मला आजी व आजोबांसाठी काठी खरेदी करण्याची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

व्याकरण व भाषाभ्यास

खालील विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. थंड
  2. सापडणे
  3. सुगंध
  4. जुना
  5. लक्ष
  6. स्मृती
  7. थोरला

उत्तरः

  1. गरम
  2. हरवणे
  3. दुर्गध
  4. नवीन
  5. दुर्लक्ष
  6. विस्मृती’
  7. धाकटा

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. सुट्टी
  2. वास
  3. मेघ
  4. सुंदर
  5. पृथ्वी
  6. ध्येय
  7. भाऊ
  8. अश्रू
  9. पंख
  10. गारठा
  11. पाणी
  12. दृष्टी
  13. स्मृती
  14. बंड

उत्तरः

  1. रजा
  2. गंध
  3. ढग
  4. छान
  5. अवनी, धरती
  6. उद्दिष्ट
  7. बंधू
  8. आसवं
  9. पर
  10. गारवा
  11. जल
  12. नजर
  13. आठवणी
  14. स्तोम

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला,

  1. चौघडी
  2. गाबडी
  3. कपडा
  4. सदर
  5. डोळा
  6. नाला
  7. कोरडा
  8. खिसा

उत्तर:

  1. चौघड्या
  2. गावड्या
  3. कपडे
  4. सदरे
  5. डोळे
  6. नाले
  7. कोरडे
  8. खिसे

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला

  1. आई
  2. भाऊ
  3. दादा
  4. शिंपी
  5. धाकटा

उत्तर:

  1. वडील
  2. बहीण
  3. ताई
  4. शिंपीण
  5. धाकटी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 4.
कंसातील वाक्प्रचारांचा दिलेल्या वाक्यांत बिनचूक उपयोग करून ती वाक्ये पुन्हा लिहा. (निश्चय करणे, डोळे अधूंनी न्हाणे, हृदयात प्रेमपूर येणे)
उत्तर:

  1. आनंदवनातील कुष्ठरोग्यांची दुःखे ऐकून माझ्या हृदयात प्रेमपूर आला.
  2. वर्गात पहिला क्रमांक काढण्याचा मी निश्चय केला.
  3. त्या गरीब माणसाची हकिकत ऐकून माझे डोळे अश्रृंनी न्हाले.

शब्दार्थ:

1. स्मृती – आठवण (memory) (२) विस्मृती – विस्मरण (oblivion)

पुढील क्रियाविशेषण अव्ययांचा वापर करून वाक्ये तयार करा.

प्रश्न 1.

  1. दररोज
  2. पूर्ण
  3. अत्यंत
  4. सर्वत्र

उत्तरः

  1. चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करावा.
  2. पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो.
  3. राजू अत्यंत हुशार मुलगा आहे.
  4. पावसात सर्वत्र हिरवळच दिसते.

लेखन विभाग

प्रश्न 1.
‘पंख असते तर एकदम उडून गेलो असतो’, यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा.
उत्तरः
श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे साठवून आपल्या धाकट्या भावासाठी कोट किंवा सदरा शिवून आणला होता.

  • राम – श्यामने आपल्या छोट्या भावासाठी नवीन कोट शिवून आणला आहे.
  • श्याम – अरे मी खाऊला दिलेले पैसे साठवले व त्यातून हा कोट शिवून घेतला.
  • राम – मग तू तुझ्या भावाला कधी देणार?
  • श्याम – मी आता गावाला जाणार आहे, तेव्हा मी त्याला हा कोट देणार.
  • राम – तू तुला नाही शिवलास नवीन कोट?
  • श्याम – अरे माझा धाकटा भाऊ कोटसाठी रडत होता तेव्हा आई त्याला म्हणाली, “तुझा दादा मोठा झाला की, तुला नवीन कोट आणेल.” राम – म्हणून तू तुझ्या धाकट्या भावाला कोट घेतला!
  • श्याम – होय आईची इच्छा होती. मला तर असे वाटते की मी एखादया पक्ष्याप्रमाणे उडून जाऊन हा कोट माझ्या धाकट्या भावाला क्यावा त्यामुळे त्याला तर आनंद होईलच पण आईला सुद्धा खूप आनंद होईल.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

श्यामचे बंधुप्रेम Summary in Marathi

पाठ परिचय:

भाऊंनी दिलेले खाऊचे पैसे खर्च न करता श्यामने लहान भावास नवीन कोट शिवला. त्याने आणलेला नवीन कोट पुरुषोत्तमने आनंदाने सर्वांना दाखवला. श्यामच्या मनातील आपल्या लहान भावंडाविषयी असलेले प्रेम व जिव्हाळा, तसेच परस्परांवर प्रेम करा ही आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

Shyam saved all his pocket money given by his father and he stitched a new coat for his younger brother from his savings. The younger brother, Purushottam, showed his new coat happily to everyone. Shyam’s love and affection for his younger brother and teachings of his mother of giving love to everyone have been beautifully narrated in a very heart-touching way.

शब्दार्थ:

  1. तप्त – तापलेला – heated
  2. रम्य – सुंदर, मोहक – beautiful, attractive
  3. गंध – वास – fragrance
  4. निश्चय – निर्णय – determination
  5. हट्ट – हेका – insistence
  6. गाबड्या – ठिगळ – a patch
  7. उत्सुक – आतुर – eager
  8. पंचमहाभूत – पाच मूलभूत तत्त्वे – the five elements:
    पृथ्वी, जल, अग्नि, earth, water, fire,
    वायू, आकाश wind & sky
  9. गाठोडे – बोचके – a bundle
  10. फलद्रूप – सफल, फळाला – fruitful आलेली
  11. कोरडे – शुष्क, सुकलेले – dry
  12. कर्ज – उसने – loan
  13. दवडणे – व्यर्थ जाऊ देणे – to waste
  14. उधार – उसने – on credit

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

वाक्प्रचारः

  1. निश्चय करणे – मनाशी पक्के ठरविणे
  2. डोळे अधूंनी न्हाणे – डोळ्यांतून अश्रू ओघळणे, खूप रडणे
  3. दुथडी भरून वाहणे – तुडुंब वाहणे
  4. धावपळ करणे – धावाधाव करणे
  5. कर्ज घेणे – उसने घेणे
  6. गहिवरून येणे – कंठ दाटून येणे
  7. पाठीवरून हात फिरवणे – कौतुक करणे
  8. रोजगारी होणे – कामधंदयाला लागणे

टिपा:

  1. पिसई, सोंडेघर – दापोलीहून पालघरला (साने गुरुजीचे गाव) जाताना लागणाऱ्या ओढ्यांची नावे.
  2. आणा, दोन आणे – त्यावेळी असलेले पैसे.
  3. संध्या करणे – दिवेलागणीच्या वेळेस देवाची प्रार्थना करणे.
  4. गंधवती पृथ्वी – पावसाचे पाणी मातीमध्ये पडताच मातीचा सुगंध येऊ लागतो. या सुगंधामुळे पृथ्वीला गंधवती पृथ्वी म्हटले आहे.

Marathi Sulabhbharati Class 7 Solutions

Ghar Class 6 Marathi Chapter 9 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 9 घर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 6th Marathi Chapter 9 घर (कविता) Question Answer Maharashtra Board

Std 6 Marathi Chapter 9 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 9 घर Textbook Questions and Answers

1. एक – दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
उत्तर:
माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते.

प्रश्न आ
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
उत्तर:
घराने नवी मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न इ
आईच्या हातचे जेवण कसे असते?
उत्तर:
आईच्या हातचे जेवण चविष्ट असते.

2. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा. 

प्रश्न 1.
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
उत्तर:
घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनवलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वत:चा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वत:ची अशी एक ओळख असते.

घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घराने सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवीन-नवीन मूल्य स्विकारावीत व नवीननवीन ज्ञान आत्मसात करावे. घरात आई अपार कष्ट करत असते. आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनविते ते अतिशय चविष्ट व रूचकर असते. अशा प्रकारे कवी ‘धुंडिराज जोशी’ यांनी घराचे वर्णन केले आहे.

3. खालील आकृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 1

प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 1
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 2

3. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा. 

वस्तू, खोल्या, जिव्हाळा, पसारा, पाहायला, सावधान, भान, गोष्ट, चविष्ट

प्रश्न 1.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा.
वस्तू, खोल्या, जिव्हाळा, पसारा, पाहायला, सावधान, भान, गोष्ट, चविष्ट
उत्तर:

  1. वस्तू – वास्तू
  2. खोल्या – ओल्या
  3. जिव्हाळा – शाळा
  4. पसारा – निवारा
  5. पाहायला – चालायला
  6. लढायला – चढायला
  7. सावधान – समाधान
  8. भान – ज्ञान
  9. गोष्ट – कष्ट
  10. चविष्ट – गप्पिष्ट

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

4. योग्य पर्याय निवडून लिहा.

प्रश्न अ.
घरात हव्या भावना ओल्या – म्हणजे
(अ) घरातील व्यक्तींनी रडावे
(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
(इ) घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.
उत्तर:
(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.

प्रश्न ब.
घर शिक्षणाची पहिली शाळा – म्हणजे
(अ) घरामध्ये बालमंदिर भरते.
(आ) घरापासून शिक्षणाला सुरूवात होते.
(इ) घराच्या शाळेत नाव घातले जाते.
उत्तर:
(आ) घरापासून शिक्षणाला सुरूवात होते.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न क.
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान – म्हणजे
(अ) नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.
(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
(इ) काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
उत्तर:
(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

5. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा. 

प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
उत्तर:

  1. मातृछाया
  2. गोकुळधाम
  3. शांतीनिवास
  4. कृष्णकुंज
  5. गीताई
  6. ग्रीनव्हिला
  7. दिपांजली
  8. शिवसदन
  9. राधाकृष्णनिवास
  10. मातोश्री
  11. सह्याद्री व्हिला
  12. मनःस्मृती
  13. केशवधाम
  14. शांतनुनिवास
  15. वृंदावन
  16. उत्कर्ष

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

6. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.

प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
उत्तर:

  1. चविष्ट – चव असणारे
  2. विशिष्ट – ठरावीक प्रकारचा
  3. भ्रमिष्ट – भ्रम झालेला
  4. गप्पिष्ट – गप्पा मारणारा
  5. कोपिष्ट – रागावलेला
  6. अनिष्ट – योग्य नसलेले

7. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. 

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 3

प्रश्न 1.
खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 3
उत्तर:

शब्द लिंग वचन
1. घर नपुंसकलिंगी घरे
2. भिंत स्त्रीलिंगी भिंती
3. चेहरा पुल्लिंगी चेहरे
4. निवारा पुल्लिंगी निवारे
5. आई स्त्रीलिंगी आया
6. डोंगर पुल्लिंगी डोंगर
7. हवा स्त्रीलिंगी हवा
8. आजोबा नपुंसकलिंगी आजोबा

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

8. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 4

9. खालील शब्द वाचा लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 5

10. वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा. लिहा. उदा., वस्तू – जिन्नस, नग वास्तू – घर
कप – काप, तार – तारा, खरे – खारे, गर – गार, घर – घार, चार – चारा, पर – पार, वर – वार

प्रश्न 1.
कप – काप
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 6

प्रश्न 2.
तार – तारा
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 7

प्रश्न 3.
खरे – खारे
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 8

प्रश्न 4.
गर – गार
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 9

प्रश्न 5.
घर – घार
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 10

प्रश्न 6.
चार – चारा
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 11

प्रश्न 7.
पर – पार
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 12

प्रश्न 8.
वर – वार
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 13

11. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यांचे सहा सात वाक्यांत वर्णन करा. 

प्रश्न अ.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यांचे सहा सात वाक्यांत वर्णन करा.
उत्तर:
माझ्या घराचे नाव ‘गोकुळधाम’ आहे. माझ्या घरात मी, माझे आई-बाबा व मोठी ताई असे चार जण राहतो. माझी आई घरातील सर्व कामे करते. माझे बाबा शेताची सर्व कामे करतात. मी व ताई आम्ही रोज शाळेत जातो व अभ्यास करतो. माझ्या घराभोवती विविध प्रकारची झाडे आहेत. माझ्या घरासमोरून एक नदी वाहते. तिचे पाणी स्वच्छ व चवदार आहे. माझे घर म्हणजे फक्त दगड व माती पासून बनवलेल्या भिंती नसून त्यात एक प्रकारचा जिव्हाळा आहे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न आ.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 14
उत्तर:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 15
उत्तरः
पाण्यात राहून माशाशी वैर करू नये,

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 16
उत्तर:
वासरात लंगडी गाय शहाणी.

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 17
उत्तर:
अडला हरी गाढवाचे पाय धरी.

प्रश्न इ.
खालील चित्रांच्या सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 18
उत्तर:
काही मुले स्वच्छंदी मनाची असतात. माझे मनही तसेच आहे. मी एके दिवशी क्रिकेटचे सामान घेऊन मोकळ्या माळरानावर खेळायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मी काही फुलपाखरे पाहिली. ती त्या माळावर स्वच्छंदी उडत होती. बागडत होती. त्यांच्या पंखावरील विविध रंग पाहून मी आश्चर्यचकितच झालो. निसर्ग ही रंगांची किमया कशी साधतो ते मला कळेना. त्याच मोकळ्या माळावर काही मुले पतंग उडवताना दिसली. त्यांचे त्या पतंगांचे विविध रंग पाहून मलाही पतंग उडवण्याचा मोह झाला आणि मी क्रिकेट सोडून पतंग उडवण्यात गुंग झालो.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 9 घर Important Additional Questions and Answers

खालील पदयपंक्तींच्या रिकाम्या जागा भरून ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. घर नाही चार …………….. घर असते देखण्या ……………..
  2. घर नाही एक……………… .घर म्हणजे आनंदी …………….. .
  3. घर नाही नुसत्या ……………. घरात हव्या भावना …………….. .
  4. घरात हवा ………………., घर शिक्षणाची पहिली …………….. .
  5. घर नाही पसारा, घर नाही ………………… निवारा.
  6. घराला असते …………….., घराला असतो आपला .
  7. घराने असावे …………….. घराने द्यावे …………….. .
  8. घराने ठेवावे …………….. भान, जवळ करावीत नवी …………….. नवीन ……………….
  9. घरात आईचे अपार …………….. ,आजी सांगते ……………… गोष्ट,
  10. घरात आजोबा …………….. , आईच्या हातचे जेवण …………….. .

उत्तर:

  1. भिंती, कृती
  2. वस्तू, वास्तू
  3. खोल्या, ओल्या
  4. जिव्हाळा, शाळा
  5. नुसता, केवळ
  6. कहाणी, चेहरा
  7. सावधान, समाधान
  8. काळाचे, मूल्ये, ज्ञान
  9. कष्ट, सुंदर
  10. गप्पिष्ट, चविष्ट

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

खालील प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
घर कसल्या कृती असते?
उत्तर:
घर देखण्या कृती असते.

प्रश्न 2.
घर म्हणजे कशी वास्तू असते?
उत्तर:
घर म्हणजे आनंदी वास्तू असते..

प्रश्न 3.
घरात कशा भावना हव्यात?
उत्तर:
घरात ओल्या भावना हव्यात.

प्रश्न 4.
घराला स्वत:चा असा काय असतो?
उत्तर:
घराला स्वत:चा असा आपला चेहरा असतो.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न 5.
घर काय काय शिकवते?
उत्तर:
घर पाहायला, चालायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला शिकवते.

प्रश्न 7.
घराने कशाचे भान ठेवावे?
उत्तर:
घराने काळाचे भान ठेवावे.

प्रश्न 8.
घरात अपार कष्ट कोण करते?
उत्तर:
घरात अपार कष्ट आई करते.

प्रश्न 9.
घरात सुंदर गोष्ट कोण सांगते?
उत्तर:
घरात सुंदर गोष्ट आजी सांगते.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न 10.
घरात गप्पा करणारे कोण आहेत?
उत्तर:
घरात आजोबा गप्पा करणारे आहेत.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. घर
  2. जिव्हाळा
  3. पहिली
  4. शाळा
  5. कहाणी
  6. चेहरा
  7. डोंगर
  8. काळ
  9. मूल्ये
  10. कष्ट ङ्के

उत्तर:

  1. सदन, पास्त, निवास
  2. प्रेम
  3. प्रथम
  4. विद्यालय
  5. गोष्ट, कथा
  6. तोंड, वदन
  7. पर्वत
  8. वेळ
  9. आदर्श
  10. परिश्रम

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न 5.
विरूद्धार्थी शब्द लिहा.

  1. देखणा
  2. एक
  3. आनंद
  4. ओल्या
  5. जिव्हाळा
  6. पहिली
  7. असते
  8. ज्ञान
  9. सुंदर
  10. आजी
  11. जवळ

उत्तर:

  1. विद्रुप
  2. अनेक
  3. दु:ख
  4. सुक्या
  5. द्वेष, मत्सर
  6. शेवटची
  7. नसते
  8. अज्ञान
  9. कुरूप
  10. आजोबा
  11. दूर

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न 6.
खालील शब्दांचे वचन बदला,

  1. घर
  2. भिंत
  3. खोली
  4. ओली
  5. शाळा
  6. निवारा
  7. कहाणी
  8. चेहरा
  9. मूल्य
  10. गोष्ट

उत्तर:

  1. घरे
  2. भिंती
  3. खोल्या
  4. ओल्या
  5. शाळा
  6. निवारे
  7. कहाण्या
  8. चेहरे
  9. मूल्ये
  10. गोष्टी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

प्रश्न 2.
खालील वेब पूर्ण करा.
उत्तर:
1.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 19
2.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 20

खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.

प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
उत्तर:

  1. नादिष्ट – छंद असणारा
  2. गर्विष्ट – गर्व असणारा
  3. कनिष्ट – लहान असणारा
  4. वरिष्ट – मोठा असणारा
  5. इष्ट – चांगले

चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर 21
उत्तरः
हातच्या कंकणाला आरसा कशाला.

प्रश्न 2.
नाकापेक्षा जड
उत्तर:
नाकापेक्षा मोती जड.

घर Summary in Marathi

काव्य परिचयः

‘घर’ या कवितेत धुंडिराज जोशी यांना घर म्हणजे केवळ चार भिंती नसून त्यापलिकडेही बरेच काही असल्याचा विचार मांडला आहे. घर एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जिव्हाळा, अनके भावना निगडित असतात. हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, आपल्याला समाधान देते. याच घरात आजी, आजोबा या सगळ्यांच्या आठवणीदेखील सामावलेल्या असतात. घरासंबंधीचे फार सुंदर विचार या कवितेत मांडले आहेत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर

शब्दार्थ:

  1. घर – निवास, निवारा (house)
  2. भिंत – तट (wall)
  3. देखण्या – सुंदर (beautiful)
  4. कृती – काम (work)
  5. वस्तू – (things)
  6. वास्तू – इमारत (building)
  7. नुसत्या – फक्त, केवळ (only)
  8. खोली – (room)
  9. हव्या – पाहिजेत (want)
  10. ओल्या भावना – प्रेमळ भावना (loving feelings)
  11. जिव्हाळा – आत्मीयता (attachment)
  12. पहिली – प्रथम (first)
  13. शाळा – विद्यालय (school)
  14. नुसता – फक्त, केवळ (only)
  15. निवारा – आसरा (shelter)
  16. कहाणी – गोष्ट, कथा (story)
  17. चेहरा – मुखवटा, तोंड (face)
  18. डोंगर – पर्वत (mountain)
  19. चढायला – (toclimb)
  20. सावधान – जागृत (to alert, vigilant)
  21. ठेवावे – मांडणे (to keep)
  22. काळ – समय (period, time)
  23. भान – जाणीव (consciousnest)
  24. नवी – नवीन (new)
  25. मूल्ये – किंमत (value)
  26. ज्ञान – माहिती (knowledge)
  27. अपार – खूप, जास्त (to much)
  28. कष्ट – परिश्रम (hard work)
  29. आजी – (grandmother)
  30. सुंदर – छान (lovely)
  31. आजोबा – (grandfather)
  32. सांगते – (to tell) बोलणे
  33. गप्पिष्ट – गप्पा करणारे (talkative, chatter)
  34. चविष्ट – रूचकर, चवदार (tasty, delicious)

Marathi Sulabhbharati Class 6 Solutions