Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उत्तरः
नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा रम्य सुंदर वास सुटत असतो.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न आ.
श्यामने कोणता निश्चय केला होता?
उत्तरः
गणेश चतुर्थीस गावाला जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असा निश्चय श्यामने केला होता.

प्रश्न इ.
लहान भावाला आईने कसे समजावले?
उत्तरः
एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता, त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.

प्रश्न ई.
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
उत्तरः
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट-कचेरीच्या कामासाठी जात असत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न उ.
श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
उत्तरः
आपल्या लहान भावासाठी शिवलेला नवीन कोट कधी एकदा भावाला देतो, असे श्यामला झाले होते. श्यामच्या हृदयात प्रेमपूर आला होता. सुखस्वप्नात तो दंग होता. त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.

2. खालील आकृत्या पूर्ण करा. 

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 1
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 3

प्रश्न आ.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 2
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 4

3. का ते लिहा.

प्रश्न अ.
श्यामचे डोळे अणूंनी न्हाले होते.
उत्तर:
श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अधूंनी न्हाले होते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न आ.
श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला ‘जाऊ नको’ असे म्हटले.
उत्तर:
पावसापाण्याचे दिवस होते. नदीनाल्यांना पूर आले होते. पिसईचा पया, सोंडेघरचा पया यांना उतार नव्हते, यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले.

प्रश्न इ.
पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता.
उत्तर:
जोराचा पाऊस पडत होता. त्याच्या पाण्याला खूप जोर होता, त्यामुळे पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता.

प्रश्न ई.
श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
उत्तर:
श्यामची आई त्यांच्या लहान भावाला नेहमी म्हणत असे, “तुझे अण्णा, दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील”. त्याप्रमाणे श्यामने स्वत:च्या खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता म्हणून श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

चर्चा करा. सांगा.

‘पंख असते तर एकदम उडून गेलो असतो’ यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

खेळूया शब्दांशी.

(अ) खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती
दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे.

(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.

  1. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.
  2. मी, सातपुते, त्याने, तिला.
  3.  हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य.
  4. लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.

उत्तर:

  1. त्यांनी – ‘त्यांनी’ हे सर्वनाम आहे व इतर सर्व विशेष नामे आहेत.
  2. सातपुते – ‘सातपुते’ हे विशेष नाम आहे. इतर सर्व सर्वनामे आहेत.
  3. हिमालय – ‘हिमालय’ हे विशेष नाम आहे. बाकी सर्व भाववाचक नामे आहेत.
  4. आम्ही – ‘आम्ही’ हे सर्वनाम आहे. बाकी सर्व क्रियापदे आहेत.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

लिहिते होऊया.

प्रश्न 1.
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
उत्तर:
आम्ही आमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी वाढदिवसाला पुस्तक देतो. भेटकार्ड देतो. एखादे चांगले काम केले की चॉकलेट देतो. अभ्यासात चांगले गुण मिळाले की एखादे चित्र भेट म्हणून देतो.

 

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 5
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 8

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम Important Additional Questions and Answers

खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्ये पुन्हा लिहा.

  1. तप्त जमिनीला …………. शांतवू लागले.
  2. थंडीच्या दिवसांत ……………. चौघडी’ करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे.
  3. एक ……………. माझ्या पायाजवळून उडी मारून गेली.
  4. पिसईचा पह्या ……………….. भरून वाहत होता.
  5. ……………. दगड पायांना खुपत होते; परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते.
  6. त्या ………………. नाचातून मी चाललो होतो.
  7. वडील ……………… करत होते व आईने शेगडीत ………………. शेकण्यासाठी दिले होते.
  8. ”……………. पह्याला पाणी नव्हते का रे?”
  9. या प्रेमावर कोणाची ……………. नको पडायला.

उत्तर:

  1. मेष
  2. धोतर
  3. नानेटी
  4. दुथडी
  5. सुयांसारखे
  6. पंचमहाभूतांच्या
  7. संध्या, निखारे
  8. सोंडेघरच्या
  9. दृष्टी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

असे कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
“तुझे अण्णा – दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.”
उत्तर:
श्यामची आई आपल्या लहान मुलाला (पुरुषोत्तमला)
म्हणाली.

प्रश्न 2.
“इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?”
उत्तर:
श्यामची आई श्यामला म्हणाली.

प्रश्न 3.
“सोंडेघरच्या पल्याला पाणी नव्हते का रे?”
उत्तर:
श्यामचे वडील श्यामला म्हणाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 4.
“हो परंतु मी आलो कसातरी!”
उत्तर:
श्याम वडिलांना म्हणाला.

प्रश्न 5.
“हा नवीन कोट कोणाला रे?”
उत्तर:
श्यामचा धाकटा भाऊ श्यामला म्हणाला.

प्रश्न 6.
“कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?”
उत्तर:
श्यामची आई श्यामला म्हणाली.

प्रश्न 7.
“आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत.”
उत्तर:
श्याम त्याच्या आईला म्हणाला.

प्रश्न 8.
“मग उधार का शिवून आणलास, श्याम?”
उत्तरः
श्यामचे वडील श्यामला म्हणाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आईने श्यामला कातर’ स्वरात काय विचारले?
उत्तर:
आईने श्यामला कातर स्वरात विचारले की, “श्याम कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?”

प्रश्न 2.
श्यामने नवीन कोट शिवण्यासाठी काय केले?
उत्तर:
वडीलांनी खाऊसाठी दिलेले आणा-दोन आणे खाऊसाठी खर्च न करता, दोन-तीन महिने ते जमवून श्यामने त्या पैशांचा पुरुषोत्तमला नवीन कोट शिवला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

शब्दार्थ:

  1. चौघडी – चार घड्या (four folded)
  2. पहया – ओढा (stream)
  3. कातर – कापरा, थरथरणारा (trembling)

खालील आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
श्याम भावंडास काय आणू शकत नव्हता?
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 6

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम 7
उत्तरः

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.

  1. ………………. डोळे होते.
  2. हृदयात ………….” आला होता.
  3. …………… नवीन कपडे करतात.

उत्तर:

  1. ध्येयावर
  2. प्रेमपूर
  3. गौरी-गणपतीत

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.

  1. श्याम रोज मोजत असलेले[ ]
  2. श्याम हयास भीक घालणार नव्हता [ ]

उत्तर:

  1. पैसे
  2. नदीनाल्यास

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
श्याम शिंप्याकडे मापासाठी कोणाला बरोबर घेऊन गेला?
उत्तर:
श्याम शिंप्याकडे मापासाठी आपल्या भावाच्या वयाच्या एका मुलाला बरोबर घेऊन गेला

प्रश्न 2.
श्यामने कोटासाठी किती कापड व किती अस्तर घेतले?
उत्तर:
श्यामने कोटासाठी दोन वार कापड व अर्धा वार अस्तर घेतले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. सुट्टी
  2. कोट
  3. नाले
  4. खिसा

उत्तर:

  1. सुट्ट्या
  2. कोट
  3. नाला
  4. खिसे

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये शोधा व त्यांचे प्रकार सांगा.

प्रश्न 1.
रोज पैसे मोजत होतो.
उत्तर:
रोज – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही पैसे साठवता का? साठवलेल्या पैशांचा उपयोग कशासाठी करण्याची तुमची इच्छा आहे?
उत्तर:
मला प्रथम पैसे साठवण्याची सवय नव्हती. पण आजीने छोटीशी पिगी बैंक आणून देताच मला त्यात पैसे साठवण्याची सवय जडली. त्यात आवश्यक तेवढे पैसे जमताच मला आजी व आजोबांसाठी काठी खरेदी करण्याची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

व्याकरण व भाषाभ्यास

खालील विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. थंड
  2. सापडणे
  3. सुगंध
  4. जुना
  5. लक्ष
  6. स्मृती
  7. थोरला

उत्तरः

  1. गरम
  2. हरवणे
  3. दुर्गध
  4. नवीन
  5. दुर्लक्ष
  6. विस्मृती’
  7. धाकटा

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. सुट्टी
  2. वास
  3. मेघ
  4. सुंदर
  5. पृथ्वी
  6. ध्येय
  7. भाऊ
  8. अश्रू
  9. पंख
  10. गारठा
  11. पाणी
  12. दृष्टी
  13. स्मृती
  14. बंड

उत्तरः

  1. रजा
  2. गंध
  3. ढग
  4. छान
  5. अवनी, धरती
  6. उद्दिष्ट
  7. बंधू
  8. आसवं
  9. पर
  10. गारवा
  11. जल
  12. नजर
  13. आठवणी
  14. स्तोम

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला,

  1. चौघडी
  2. गाबडी
  3. कपडा
  4. सदर
  5. डोळा
  6. नाला
  7. कोरडा
  8. खिसा

उत्तर:

  1. चौघड्या
  2. गावड्या
  3. कपडे
  4. सदरे
  5. डोळे
  6. नाले
  7. कोरडे
  8. खिसे

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला

  1. आई
  2. भाऊ
  3. दादा
  4. शिंपी
  5. धाकटा

उत्तर:

  1. वडील
  2. बहीण
  3. ताई
  4. शिंपीण
  5. धाकटी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

प्रश्न 4.
कंसातील वाक्प्रचारांचा दिलेल्या वाक्यांत बिनचूक उपयोग करून ती वाक्ये पुन्हा लिहा. (निश्चय करणे, डोळे अधूंनी न्हाणे, हृदयात प्रेमपूर येणे)
उत्तर:

  1. आनंदवनातील कुष्ठरोग्यांची दुःखे ऐकून माझ्या हृदयात प्रेमपूर आला.
  2. वर्गात पहिला क्रमांक काढण्याचा मी निश्चय केला.
  3. त्या गरीब माणसाची हकिकत ऐकून माझे डोळे अश्रृंनी न्हाले.

शब्दार्थ:

1. स्मृती – आठवण (memory) (२) विस्मृती – विस्मरण (oblivion)

पुढील क्रियाविशेषण अव्ययांचा वापर करून वाक्ये तयार करा.

प्रश्न 1.

  1. दररोज
  2. पूर्ण
  3. अत्यंत
  4. सर्वत्र

उत्तरः

  1. चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करावा.
  2. पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो.
  3. राजू अत्यंत हुशार मुलगा आहे.
  4. पावसात सर्वत्र हिरवळच दिसते.

लेखन विभाग

प्रश्न 1.
‘पंख असते तर एकदम उडून गेलो असतो’, यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा.
उत्तरः
श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे साठवून आपल्या धाकट्या भावासाठी कोट किंवा सदरा शिवून आणला होता.

  • राम – श्यामने आपल्या छोट्या भावासाठी नवीन कोट शिवून आणला आहे.
  • श्याम – अरे मी खाऊला दिलेले पैसे साठवले व त्यातून हा कोट शिवून घेतला.
  • राम – मग तू तुझ्या भावाला कधी देणार?
  • श्याम – मी आता गावाला जाणार आहे, तेव्हा मी त्याला हा कोट देणार.
  • राम – तू तुला नाही शिवलास नवीन कोट?
  • श्याम – अरे माझा धाकटा भाऊ कोटसाठी रडत होता तेव्हा आई त्याला म्हणाली, “तुझा दादा मोठा झाला की, तुला नवीन कोट आणेल.” राम – म्हणून तू तुझ्या धाकट्या भावाला कोट घेतला!
  • श्याम – होय आईची इच्छा होती. मला तर असे वाटते की मी एखादया पक्ष्याप्रमाणे उडून जाऊन हा कोट माझ्या धाकट्या भावाला क्यावा त्यामुळे त्याला तर आनंद होईलच पण आईला सुद्धा खूप आनंद होईल.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

श्यामचे बंधुप्रेम Summary in Marathi

पाठ परिचय:

भाऊंनी दिलेले खाऊचे पैसे खर्च न करता श्यामने लहान भावास नवीन कोट शिवला. त्याने आणलेला नवीन कोट पुरुषोत्तमने आनंदाने सर्वांना दाखवला. श्यामच्या मनातील आपल्या लहान भावंडाविषयी असलेले प्रेम व जिव्हाळा, तसेच परस्परांवर प्रेम करा ही आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

Shyam saved all his pocket money given by his father and he stitched a new coat for his younger brother from his savings. The younger brother, Purushottam, showed his new coat happily to everyone. Shyam’s love and affection for his younger brother and teachings of his mother of giving love to everyone have been beautifully narrated in a very heart-touching way.

शब्दार्थ:

  1. तप्त – तापलेला – heated
  2. रम्य – सुंदर, मोहक – beautiful, attractive
  3. गंध – वास – fragrance
  4. निश्चय – निर्णय – determination
  5. हट्ट – हेका – insistence
  6. गाबड्या – ठिगळ – a patch
  7. उत्सुक – आतुर – eager
  8. पंचमहाभूत – पाच मूलभूत तत्त्वे – the five elements:
    पृथ्वी, जल, अग्नि, earth, water, fire,
    वायू, आकाश wind & sky
  9. गाठोडे – बोचके – a bundle
  10. फलद्रूप – सफल, फळाला – fruitful आलेली
  11. कोरडे – शुष्क, सुकलेले – dry
  12. कर्ज – उसने – loan
  13. दवडणे – व्यर्थ जाऊ देणे – to waste
  14. उधार – उसने – on credit

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम

वाक्प्रचारः

  1. निश्चय करणे – मनाशी पक्के ठरविणे
  2. डोळे अधूंनी न्हाणे – डोळ्यांतून अश्रू ओघळणे, खूप रडणे
  3. दुथडी भरून वाहणे – तुडुंब वाहणे
  4. धावपळ करणे – धावाधाव करणे
  5. कर्ज घेणे – उसने घेणे
  6. गहिवरून येणे – कंठ दाटून येणे
  7. पाठीवरून हात फिरवणे – कौतुक करणे
  8. रोजगारी होणे – कामधंदयाला लागणे

टिपा:

  1. पिसई, सोंडेघर – दापोलीहून पालघरला (साने गुरुजीचे गाव) जाताना लागणाऱ्या ओढ्यांची नावे.
  2. आणा, दोन आणे – त्यावेळी असलेले पैसे.
  3. संध्या करणे – दिवेलागणीच्या वेळेस देवाची प्रार्थना करणे.
  4. गंधवती पृथ्वी – पावसाचे पाणी मातीमध्ये पडताच मातीचा सुगंध येऊ लागतो. या सुगंधामुळे पृथ्वीला गंधवती पृथ्वी म्हटले आहे.