Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Textbook Questions and Answers

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?
उत्तर:
है सूचना दि. 23-9-2017 यादिवशी देण्यात आली आहे.

प्रश्न 2.
पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे ?
उत्तर:
पाणी पुरवठा 24-9-2017 या दिवशी बंद करण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 3.
पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?
उत्तर:
समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

प्रश्न 4.
पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?
उत्तर:
पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली आहे की, उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Important Additional Questions and Answers

1. सूचनाफलक

दि. 23-09-17

समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उदया आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा.

पाणीपुरवठा विभाग,
समर्थनगर.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

2. सूचनाफलक:

दि. 25-8-2018

लालबहादूर शास्त्री मार्गावरील सर्व नागरिकांना कळविण्यात येते, की आपल्या विभागातील रस्ते पावसामुळे खूपच खराब झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील दोन दिवस हा मार्ग बंद करण्यात येत आहे. तरी सर्व वाहनचालक व पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सार्वजनिक बांधकाम विभाग – लालबहादूर शास्त्री नगर ,

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ही सूचना कोणत्या विभागाकडून देण्यात आली आहे?
उत्तर:
ही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रश्न 2.
ही सूचना कोणत्या मार्गावरील नागरिकांना देण्यात आली आहे?
उत्तर:
ही सूचना लालबहादूर शास्त्री मार्गावरील नागरिकांना देण्यात आली आहे.

प्रश्न 3.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग किती दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
उत्तरः
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग दि.23 व 27-08-2018 पर्यंत दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 4.
वाहनचालक व पादचाऱ्यांनी कोणत्या मार्गाचा वापर करावा?
उत्तर:
वाहनचालक व पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

3. सूचनाफलक

दि. 28-07-2018

पल्स पोलियो मोहीम आपल्या विभामातील 0 ते 5 वर्षांच्या आतील बालकांना रविवार दि. 30-7-2018 या दिवशी सकाळी 10 ते 5.00 पर्यंत पल्स पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा आपल्या विभागातील शाखेमध्ये संपर्क साधावा व आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य दयावा.

आरोग्य विभाग
महाराष्ट्र शासन

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

प्रश्न 1.
पल्स पोलिओचा डोस किती वर्षांच्या बालकांना देण्यात येणार आहे?
उत्तर:
पल्स पोलिओचा डोस 0 ते 5 वर्षाच्या बालकांना देण्यात येणार आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

प्रश्न 2.
पल्स पोलियो डोस कोणत्या दिवशी देण्यात येणार आहे?
उत्तरः
पल्स पोलिओ डोस रविवार दि. 30-7-2018 या दिवशी देण्यात येणार आहे.

प्रश्न 3.
पल्स पोलियोची सूचना कोणत्या विभागाकडून देण्यात आली आहे?
उत्तर:
पल्स पोलिओची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रश्न 4.
पल्स पोलिओचा डोस पाजण्यासाठी नागरिकांनी कोठे संपर्क साधावचा आहे?
उत्तर:
पल्स पोलिओचा डोस पाजण्यासाठी नागरिकांनी सरकारी – दवाखान्यात किंवा आपल्या विभागातील शाखेमध्ये संपर्क साधायचा आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

शब्दार्थ:

  1. रपेट – फेरफटका (strol)
  2. हस्तकौशल्य – हताची कला, हतोटी (manual skills)
  3. पादचारी – रस्त्याने चालणारे (pedestrian)