Std 5 Marathi Lesson 8 कोणापासून काय घ्यावे Question Answer Maharashtra Board
Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
5th Std Marathi Poem Konapasun Kay Ghyave Question Answer
5th Standard Marathi Digest Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Textbook Questions and Answers
1. रिकाम्या जाग भरा.
प्रश्न 1.
रिकाम्या जाग भरा.
(अ) …………………………… ” घेऊ सावली.
………………………………. पासुन जगणे.
(आ) ……………………………… एक शिकूया.
…………………………………… जीव जगूया.
उत्तर:
(अ) झाडापासून, मातीपासून
(आ) प्रभातकाळी, जगवित
2. कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.
प्रश्न 1.
कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.
(अ) सूर्य
(आ) चंद्र
(इ) तारा
(ई) फूल
(उ) कोकिळ
(ऊ) झरा
(ए) झाड
(ऐ) माती
उत्तर:
(अ) रंग
(आ) शांती
(इ) दिव्य कांती
(ई) गंध
(उ) गाणे
(ऊ) नवे तराणे
(ए) सावली
(ऐ) जगणे
3. कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.
प्रश्न 1.
कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.
उत्तर:
- घमघम
- कटकट
- लटपट
- छमछम
- सरसर
- फडफड
- कटकट
- भरभर
- लटपट
- झरझर.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Additional Important Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
निसर्गाचे विविध घटक कोणते?
उत्तरः
सूर्य, चंद्र, तारे, आकाश, वृक्ष, पक्षी, माती, पाऊस हे सर्व निसर्गाचे घटक आहेत.
प्रश्न 2.
तुम्ही कधी निसर्गातील घटकांचा अनुभव घेतला आहे का? कशाप्रमाणे?
उत्तर:
हो. पौर्णिमेच्या रात्री चांदण्या बघण्याचा, रिमझिम पावसात भिजण्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
प्रश्न 3.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय करता?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही झाडे लावतो, पक्ष्यांचे जीव वाचवतो, पाणी जपून वापरतो.
प्रश्न 4.
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
उत्तर:
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री ‘निलम माणगावे’ आहेत.
प्रश्न 5.
प्रभातकाळी काय शिकूया?
उत्तरः
प्रभातकाळी जीव जगवत जगूया.
प्रश्न 6.
संध्यासमयी काय करूया?
उत्तर:
संध्याकाळी सारे मित्र एक होऊन हसूया.
प्रश्न 7.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.
1. …………………………. ” ताऱ्यापासून
……………………………… घेऊया कांती.
2. ……………………… एक होऊनी.
…………………………… मित्र हसूया.
उत्तर:
1. चमचमणाऱ्या, दिव्य
2. संध्यासमयी, सारे
प्रश्न 8.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
फुलापासून ……………………….
……………………………… तराणे
उत्तर:
फुलापासून गंध घेऊया .
कोकिळाकडून गाणे
झुळझुळणाऱ्या झऱ्यापासुनी
घेऊ नवे तराणे
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- शांती
- गंध
- नवे
- ऊन
- जीवन
- प्रभात
- हसणे
- एक
- सकाळ
उत्तर:
- अशांती
- दुर्गंध
- जुने
- सावली
- मरण
- संध्या
- रडणे
- अनेक
- संध्याकाळ
प्रश्न 2.
वचन बदला
- तारा
- ढग
- फूल
- मित्र
- सावली
- झाड
- झरा
- गाणे
उत्तर:
- तारे
- ढग
- फुले
- मित्र
- सावल्या
- झाडे
- झरे
- गाणी
प्रश्न 3.
लिंग बदला.
- मित्र
- कोकीळा
- मुले
उत्तर:
- मैत्रीण
- कोकीळ
- मुली
कोणापासून काय घ्यावे? Summary in Marathi
पदयपरिचय:
संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो (शिकत असतो.) त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांकडूनही घेण्यासारखे काहीना काही असते. हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहे.
शब्दार्थ:
- सूर्य – एक ग्रह (the Sun)
- रंग – वर्ण (colour)
- दिव्य – दैवी (devine)
- कांती – लकाकी (shine)
- फुले – पुष्पे (flowers)
- गंध – सुवास (smell)
- झरा – निर्झर (spring)
- गडगडणे – मेघगर्जना (thundering)
- तराणे – मंजूळ गाणे (a meldious songs)
- प्रभात – सकाळ (morning)
- संध्या – संध्याकाळ (evening)
- कोकिळ – एक गाणारा पक्षी (the cuckoo)
- माती – मृत्तिका (soil)
- शांती – शांतता (calmness)
- सावली – छाया (shadow)
- जीव – प्राण (living being)
5th Standard Marathi Digest Pdf Download
- नाच रे मोरा Class 5 Marathi Question Answer
- हत्तीचे चातुर्य Class 5 Marathi Question Answer
- खेळूया शब्दांशी Class 5 Marathi Question Answer
- हि पिसे कोणाची ? Class 5 Marathi Question Answer
- डराव डराव Class 5 Marathi Question Answer
- ऐकुया खेळूया Class 5 Marathi Question Answer
- खेळत खेळत वाचुया! Class 5 Marathi Question Answer
- कोणापासून काय घ्यावे? Class 5 Marathi Question Answer
- सिंह आणि बेडूक Class 5 Marathi Question Answer
- बैलपोळा Class 5 Marathi Question Answer
- इंधनबचत Class 5 Marathi Question Answer
- बोलावे कसे? Class 5 Marathi Question Answer
- अनुभव-१ Class 5 Marathi Question Answer
- चित्रसंदेश Class 5 Marathi Question Answer