Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 10 बैलपोळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 10 बैलपोळा

5th Standard Marathi Digest Chapter 10 बैलपोळा Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
बैलांच्या सणाला काय म्हणतात?
उत्तर:
बैलांच्या सणाला पोळा म्हणतात.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

प्रश्न (आ)
बैलांना कसे सजवले आहे?
उत्तर:
बैलांना पाठीवर मखमली झुली घातल्या आहेत. त्यांची शिंगे रंगवली आहेत व त्यांच्या कपाळी रेशमी बाशिंगे बांधली आहेत.

प्रश्न (इ)
बैलांची नावे कोणती आहेत?
उत्तर:
बैलांची नावे ढवळ्या-पवळ्या आहेत.

प्रश्न (ई)
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
उत्तर:
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात.

2. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
मखमली
उत्तर:
मखमली – पाऊस पडल्यावर धरणीने हिरवागार मखमली शालू घातल्यासारखे भासते.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

3. बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा.

प्रश्न 1.
बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा.
(अ) घोडा
(आ) वाघ
(इ) माकडे
(ई) हत्ती
(उ) मासा
(ऊ) कासव
उत्तर:
(अ) तबेला
(आ) गुहा
(इ) झाड
(ई) जंगल
(उ) पाणी
(ऊ) जमीन/पाणी

4. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा.

प्रश्न 1.
खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा.
उदा., कपाळी – कळी, पाळी, पाक, पाकळी.
(अ) पुरणपोळी
(आ) गावभर
उत्तर:
(अ) रण, पुळी, पोर, पोळी
(आ) रव, गार, वर, भर

5. ‘सजलेधजले’ अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा.

प्रश्न 1.
‘सजलेधजले’ अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा.
(अ) कामधाम
(आ) पुरणपोळी
उत्तर:
(अ) आराम
(आ) पुरणपोळी – आई छान पुरणपोळ्या बनवते.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

6. ‘गावभर मिरवणे’ म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे, खालील शब्दांना ‘भर’ हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
‘गावभर मिरवणे’ म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना ‘भर’ हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा 1
उत्तर:

1. तोंडभर – बाबांनी माझी तोंडभर स्तुती केली.
2. पिशवीभर – आईने पिशवीभर भाजी आणली.
3. हातभर – मी हातभर मेंदी काढून घेतली.
4. घरभर – हसण्याचे आवाज घरभर येत होते.

7. तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.

प्रश्न 1.
तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.
उत्तर:
माझा आवडता प्राणी सिंह आहे. त्याला जंगलाचा राजा म्हणजेच वनराज म्हणतात. त्याच्या मानेभोवती आयाळ असते. त्याच्या ओरडण्याला ‘गर्जना’ म्हणतात. सिंह शूर असतो.

8. खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत त्या अक्षरांपासून काही फुलांची नावे तयार होतात ती शोधा व लिहा.

प्रश्न 1
खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत त्या अक्षरांपासून काही फुलांची नावे तयार होतात ती शोधा व लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा 2
उत्तरः
फुलांची नावे:

  1. पारिजातक
  2. मोगरा
  3. जास्वंद
  4. शेवंती
  5. कमळ
  6. अबोली
  7. गुलछडी
  8. चाफा
  9. झेंडू
  10. सदाफुली
  11. गुलाब
  12. कमळ
  13. जुई
  14. जाई
  15. झेंडू
  16. चाफा

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 10 बैलपोळा Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
गोठ्यातील बैलांना काय करायचे आहे?
उत्तर:
गोठ्यातील बैलांना न्हाऊ घालायचे आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

प्रश्न 2.
बैल कोठे मिरवू लागले?
उत्तर:
बैल गावभर मिरवू लागले.

प्रश्न 3.
पोळ्याच्या दिवशी बैलांची कोणती विशेष काळजी घेतली जाते?
उत्तर:
पोळ्याच्या दिवशी बैलांकडून काहीही काम करून घेत नाही. त्यांना आराम दिला जातो.

प्रश्न 4.
‘बैलपोळा’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘बैलपोळा’ या कवितेचे कवी धोंडीरामसिंह राजपूत’ आहेत.

2. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.

प्रश्न 1.
पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे सजवतात?
उत्तर:
पोळ्याच्या दिवशी सर्वप्रथम बैलांना स्नान घातले जाते. त्यांच्या अंगावर मखमली झुली घातल्या जातात. शिंगे रंगवून कपाळावर रेशमी बाशिंगे बांधली जातात. अशा प्रकारे पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

प्रश्न 2.
पोळा सण का साजरा करतात?
उत्तर:
आपल्या संस्कृतीमध्ये प्राणी व पक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. पोळा सण हा त्याचाच एक भाग आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या या बैलाला एक दिवस स्वत:चा मिळावा व त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी श्रावण अमावस्येला पोळा सण साजरा करतात.

3. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
(अ) ढवळ्या
(ब) झुली
(क) सजलेधजले
उत्तर:
(अ) पवळ्या
(ब) बांधली
(क) लागले

प्रश्न 2.
‘सजलेधजले’ यासारखे जोडशब्द लिहा.
उत्तर:
(अ) कामधाम
(आ) पुरणपोळी
(इ) मित्रमैत्रिणी
(ई) घरदार
(उ) रामलक्ष्मण
(ऊ) धनुष्यबाण
(ए) राघूमैना
(ऐ) नोकरचाकर

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. सण
  2. बैल
  3. कपाळ
  4. गाव
  5. दिन
  6. काम
  7. पोळा
  8. आराम

उत्तर:

  1. उत्सव
  2. वृषभ
  3. भाल
  4. खेडे
  5. दिवस
  6. कार्य
  7. बेंदूर
  8. विश्रांती

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. आज
  2. रंगीत
  3. वर
  4. बघणे
  5. नाही
  6. काम

उत्तर:

  1. उदया
  2. रंगहीन
  3. खाली
  4. दाखवणे
  5. होय
  6. आराम

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. सण
  2. गोठा
  3. झुली
  4. शिंगे
  5. गाव
  6. पुरणपोळी
  7. बाशिंगे

उत्तर:

  1. सण
  2. गोठे
  3. झूल
  4. शिंग
  5. गावे
  6. पुरणपोळ्या
  7. बाशिंग

प्रश्न 4.
लिंग बदला.

  1. बैल
  2. घोडा
  3. वाघ
  4. माकड
  5. हत्ती
  6. शेतकरी
  7. गाववाली
  8. पुरुष

उत्तरः

  1. गाय
  2. घोडी
  3. वाघीण
  4. माकडीण
  5. हत्तीण
  6. शेतकरीण
  7. गाववाला
  8. बाई, स्त्री

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

प्रश्न 5.
पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
1. रंगीत
2. सण
उत्तरः
1. रंगीत – रंगीत फुग्यांनी वाढदिवसाला घर सजवले गेले.
2. सण – वेगवेगळे सण जीवनात आनंद. आणतात.

बैलपोळा Summary in Marathi

पदयपरिचय:

बैलपोळा म्हणजे वर्षभर शेतकऱ्याबरोबर राबणाऱ्या बैलाचा सण. शेतकरी हा सण कशा प्रकारे साजरा करतात त्याचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवींनी केले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 10 बैलपोळा

शब्दार्थ:

  1. सण – उत्सव (festival)
  2. बैल – वृषभ (bullock)
  3. गोठा – गाय, बैल राहण्याची राहण्याची जागा (shed)
  4. मखमली – एक प्रकारचे अतिशय तलम मऊ वस्त्र (of velvet)
  5. झुली – घोडा, हत्ती, बैलांच्या पाठीवर घालायचे आच्छादन (a cloth of rich brocade to cover the body of animals such as horse, elephant, bullock)
  6. शिंगे – जनावरांच्या डोक्यावरील अवयव (horns)
  7. रेशमी – रेशमाचे (silken)
  8. बाशिंग – विवाह प्रसंगी नवरा, नवरीच्या कपाळावर बांधायचे एक आभूषण (an ornamental headgear usually of paper)
  9. धजणे – धाडस करणे (to have courage)
  10. गाव – ग्राम (a village)
  11. दिन – दिवस (a day)
  12. आराम – विश्रांती (rest)
  13. कपाळ – भाळ (forehead)