Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 6 वस्तू (कविता) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 6 वस्तू (कविता)
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 6 वस्तू Textbook Questions and Answers
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…
प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ……………………………..
(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ……………………………..
उत्तर:
(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत; कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.
(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.
प्रश्न 3.
काव्यसौंदर्य.
(अ) कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.
(आ) ‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
उत्तर:
द. भा. धामणस्कर यांनी ‘वस्तू’ या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे.
बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात, हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो, तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखादया लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांधींचे वचन आहे की ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे’, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे, ‘वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची’ या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे.
(इ) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.
उत्तर:
माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी घुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वया कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली; त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वह्या गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी धडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले.
(ई) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.
उत्तर:
आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित माती विखुरली गेली. मी सोबतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले ‘ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेव!’ तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विदयार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात – असे समजावून सांगितले. तो मला ‘सॉरी’ म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.
उपक्रम:
(१) तुमच्या घरातील आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा.
(२) वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवादलेखन करा.
(३) तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू/विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली, तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा.
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा,
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
कंदील : …………………………………………………………………..
विजेरी : …………………………………………………………………..
उत्तर : …………………………………………………………………..
कंदील: फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?
विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.
कंदील: असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.
विजेरी: ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.
कंदील: हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो!
विजेरी: तू तर उगाचच मिणमिणतोस. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ, कशी लखलखते मी!
कंदील: अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ’। समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.
विजेरी: तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस!
कंदील: माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे.
विजेरी: हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही.
कंदील: असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये!
Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 6 वस्तू Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(i) नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा –
(ii) शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क –
उत्तर:
(i) नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा – आपला स्नेह
(ii) शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क – कृतग्नतापूर्ण निरोपाचा
प्रश्न 3.
एका वाक्यात लिहा:
(i) वस्तू केव्हा सुखावतात?
(ii) वस्तूंना कोणती हमी दयावी?
उत्तर:
(i) वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की वस्तू प्रचंड सुखावतात.
(ii) आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही, याची वस्तूंना हमी दयावी.
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान दयावा त्यांना.
वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी दया.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन,
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा,
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
(i) वस्तूंना वेगळी, ………………………………. खोली नको असते. (कुठलीही/स्वतंत्र/आपलीशी/माणसांची)
(ii) वस्तूंना ………………………………. न होण्याची हमी दया. (विकसित/आधारित/निष्कासित/पुलकित)
उत्तर:
(i) वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते.
(ii) वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी दया.
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी…
प्रश्न. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
नोंद: – प्रश्नामधील कृतींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यापुढे सर्व पक्ष्यपाठांमध्ये प्रश्नाखाली केवळ कवितेचे नाव आणि त्यापुढे मुद्द्यांसमोर उत्तरे देण्यात आली आहेत.
कविता-वस्तू. (मार्च ‘१९)
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी: द. भा. धामणस्कर.
(२) कवितेचा रचनाप्रकार: मुक्तछंद.
(३) कवितेचा काव्यसंग्रह: भरून आलेले आकाश.
(४) कवितेचा विषय: निर्जीव वस्तूंचा सजीवपणा.
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: निर्जीव वस्तूंमधून खरे तर मानवी जीवनच व्यक्त होत असते.
(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते. या कवितेत तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहजसंवाद घडतो. साध्या पण आवाहक शब्दांतून मोठे तत्त्व येथे व्यक्त होते. अत्यंत हळुवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्याच साध्या शब्दांतून व्यक्त करतात.
(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: निर्जीव वस्तूंनाही भावना असते, त्यांनाही मन असते, असा महत्त्वाचा विचार कवी या कवितेत मांडतात. माणसे वस्तूंचा वापर करतात. त्यांना हाताळतात. त्यांच्या वस्तूंशी वागण्याच्या पद्घतीतून वस्तूंचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच, त्या वस्तूच्या स्वरूपावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कळते. यावरूनच वस्तू सजीव असतात, असे कवींना वाटते. वस्तू आणि माणसे यांच्यातील नाते या कवितेतून उलगडून दाखवले आहे.
(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो. कवींच्या मते, त्यांना मन असते, भावना असते. त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो, तसेच वस्तूंशी वागले पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे.
(९) कवितेतील आवडलेली ओळ:
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.
(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे. एक वेगळाच चाकोरीबाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप घडते. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्यांचे मन कळते. आपण वस्तूशी प्रेमाने वागतो. म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते.
(११) कवितेतून मिळणारा संदेश: वस्तूंशी माणसाने प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे.
रसग्रहण
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (इ) साठी…
प्रश्न.
पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा: ‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.’
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
काव्यसौंदर्य: बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
भाषिक सौंदर्य: मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१. समास:
सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा:
सामासिक शब्द – विग्रह
(i) प्रतिमास – (अ) मागे किंवा पुढे
(ii) ईश्वरनिर्मित – (आ) सात स्वर्गाचा समूह
(iii) सप्तस्वर्ग – (इ) धावणे, पळणे वगैरे
(iv) ऊनपाऊस – (ई) ईश्वराने निर्मित
(v) मागेपुढे – (उ) प्रत्येक महिन्याला
(vi) धावपळ – (ऊ) ऊन आणि पाऊस
उत्तर:
(i) प्रतिमास – प्रत्येक महिन्याला
(ii) ईश्वरनिर्मित – ईश्वराने निर्मित
(iii) सप्तस्वर्ग – सात स्वर्गांचा समूह
(iv) ऊनपाऊस – ऊन आणि पाऊस
(v) मागेपुढे – मागे किंवा पुढे
(vi) धावपळ – धावणे, पळणे वगैरे
२. अलंकार:
पुढील उदाहरण वाचून तक्ता पूर्ण करा:
(i) उदा., संगे असता नाथा आपण, प्रासादाहुन प्रसन्न कानन उपमेय → [ ] उपमान → [ ] अलंकाराचे नाव → [ ]
(ii) लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।। अलंकाराचे नाव → [ ] अलंकाराचे स्पष्टीकरण → [ ]
उत्तर:
(i) उपमेय → जंगल उपमान → प्रासाद (राजवाडा) अलंकाराचे नाव → व्यतिरेक अलंकार
(ii) अलंकाराचे नाव → दृष्टान्त अलंकार अलंकाराचे स्पष्टीकरण → या चरणात मुंगी लहान होऊन साखरेचा कण खाते.. तशी नम्रता मला दयावी अशी देवाकडे विनवणी केली आहे. नम्रता गुण अंगिकारावा हे सांगताना मुंगीचा दृष्टान्त दिला आहे. म्हणून हा दृष्टान्त अलंकार आहे.
३. वृत्त:
पुढील काव्यपंक्तींचे गण पाडून वृत्त ओळखा:
स्वये सर्वथा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावे।।
उत्तर:
वृत्त: हे भुजंगप्रयात वृत्त आहे.
४. शब्दसिद्धी:
(i) निः + कासित = निष्कासित, याप्रमाणे निः हा उपसर्ग लावून पुढील शब्द लिहा:
(१) फळ – ………………………
(२) काम – ………………………
(३) कर्ष – ………………………
(४) कांचन – ………………………
उत्तर:
(१) निष्फळ
(२) निष्काम
(३) निष्कर्ष
(४) निष्कांचन.
(ii) ‘क’ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:
(१) सेवक
(२) लेखक
(३) वाचक
(४) साधक.
५. सामान्यरूप:
पुढील तक्ता पूर्ण करा:
शब्द – सामान्यरूप
(i) वस्तूंना …………………..
(ii) जागेवरून …………………..
(iii) हक्काच्या …………………..
(iv) हाताला …………………..
उत्तर:
शब्द – सामान्यरूप
(i) वस्तूंना – वस्तूं
(ii) जागेवरून – जागे
(iii) हक्काच्या – हक्का
(iv) हाताला – हाता
६. वाकप्रचार:
योग्य अर्थ निवडा:
उत्तर:
(i) शिल्लक ठेवणे
(ii) आश्वासन देणे
भाषिक घटकांवर आधारित कृती:
१. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा:
उत्तर:
प्रश्न 2.
पुढील शब्दाच्या अक्षरांतून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा:
उत्तर:
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा:
(i) जीव – …………………………
(ii) मन = …………………………
(iii) आयुष्य = …………………………
(iv) घर = …………………………
उत्तर:
(i) जीव = प्राण
(ii) मन = चित्त
(iii) आयुष्य = जीवन
(iv) घर = गृह.
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) सुखावतात x …………………………
(ii) सेवक x …………………………
(iii) मान x …………………………
(iv) स्वतंत्र x …………………………
(v) आवड x …………………………
(vi) स्वच्छ x …………………………
(vii) जिवंत x …………………………
(viii) नंतर x …………………………
(ix) कृतज्ञता x …………………………
(x) सजीव x …………………………
उत्तर:
(i) सुखावतात x दुखावतात
(ii) सेवक x मालक
(iii) मान x अपमान
(iv) स्वतंत्र x परतंत्र
(v) आवड x नावड
(vi) स्वच्छ x अस्वच्छ
(vii) जिवंत x मृत
(viii) नंतर x आधी
(ix) कृतज्ञता x कृतघ्नता
(x) सजीव x निर्जीव,
२. लेखननियम:
अचूक शब्द ओळखा:
(i) नीर्जीव/निर्जिव/निर्जीव/नीर्जिव.
(ii) अतर्मुख/अंतर्मुख/अंर्तमुख/अंतर्मूख.
(iii) सामुहिक/सामुहीक/सामूहिक/सामूहीक.
(iv) अंतकरण/अतःकरण/अंतःकरन/अंतःकरण,
उत्तर:
(i) निर्जीव
(ii) अंतर्मुख
(iii) सामूहिक
(iv) अंतःकरण,
३. विरामचिन्हे:
पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा: त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून निष्कासित न होण्याची हमी दया.
उत्तर:
(i) [ ‘ ‘ ] → एकेरी अवतरण चिन्ह
(ii) [ . ] → पूर्ण विराम.
४. पारिभाषिक शब्द:
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी अचूक मराठी प्रतिशब्द कोणता?
उत्तर:
(i) परिवहन
(ii) आदयाक्षरे
(iii) गणसंख्या
(iv) पर्यवेक्षक.
५. भाषिक खेळ:
जसे –
जसे –
उत्तर:
वस्तू Summary in Marathi
कवितेचा भावार्थवस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात, हे सांगताना कवी म्हणतात – कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. (वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो.) कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. (वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात.)
खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा दयावा, बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान दयावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. (त्यांना तुमच्याबरोबरच राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाहीत.) फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन दया. (त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते.)
वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जिवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत. (एखादया लहान गोजिरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे.) कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत.
माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप यायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा.
वस्तू शब्दार्थ
- प्रचंड सुखावतात – खूप आनंदित होतात.
- निखालस – अगदी खरे.
- सेवक – चाकर, सेवा करणारे.
- बरोबरीचा मान – समान दर्जा.
- निष्कासित – पदच्युत, जागेवरून हलवणे.
- स्नेह – प्रेम, जिव्हाळा, माया.
- हक्क – स्व-अधिकार,
- कृतज्ञता – भावनिक ऋण, आदरयुक्त भावना.
वस्तू वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- जीव नसणे : प्राण नसणे, अचेतन असणे.
- मान देणे : आदर करणे, सन्मान देणे,
- हमी देणे : आश्वासन देणे.
- लाडावून ठेवणे : सतत कौतुक करणे,
- आयुष्य संपणे : मरण येणे.
- निरोप देणे : सोडणे.
- शाबूत ठेवणे : जपून शिल्लक ठेवणे.