Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Textbook Questions and Answers

1. खालील फरक लिहा.

प्रश्न 1.
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र व हास्यचित्र
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:
व्यंगचित्र :- हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात मांडलेला एखादा गमतीदार विचार आपल्या सहज लक्षात येतो.

हास्यचित्र :- ‘सफाईदार, रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय.’ हास्यचित्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिले की आपल्याला छान हसू येते. या गमतीदार चित्रांमध्ये एक जोक, एक विनोद मांडलेला असतो. त्या चित्रांमधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला
दिसून येत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्रे
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:

  1. हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
  2. व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्यांचा हेतू नसतो.
  3. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं.
  4. आपण जर अशा व्यंगचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवते. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हसवण्याशिवाय ते व्यंगचित्र आपल्याला अजून काहीतरी सांगू पाहत असते. आपण त्या चित्रापाशी थोडे थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो. सफाईदार रेषांनी काढलेल्या अशा गमतीदार चित्रातील दाखवलेल्या हावभावांतून व्यक्तीचे गुणदोष चटकन आपल्या लक्षात येतात.

संवेदनशील व्यक्ती असे चित्र पाहून आपल्या वागण्याबोलण्यात बदल करू शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या पाठात दिलेले हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे व्यंगचित्र पाहा. लहान मुलगा आणि मोठा माणूस दोघेही व्हायोलिन वाजवत आहेत. पण केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की, दोघेही एकच आहेत. पण लहानपणी मोठे व्हायोलिन तर मोठे झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे.

याचाच अर्थ असा की, लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते. म्हणजेच आपली आवड किंवा आपला एखादा छंद त्यांच्यासाठी सर्वस्व असते. त्या वयात ती आवड खूप मोठी असते. परंतु, वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद लहान होत जातो. बाह्य आकाराचे आकर्षण कमी झालेले असते, हे त्या चित्रकाराला सांगायचे आहे. याचाच अर्थ असा की, लहानपणी जपलेला छंद, मोठ्या आवडीने आपण मोठेपणीसुद्धा जपला तर जीवनातल्या ताण-तणावांवर, दु:खांवर आपण सहज मात करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर लहानपणीचा जपलेला छंद हा त्याचा गुण, तर मोठेपणी या छंदाकडे केलेले दुर्लक्ष हा त्याचा दोष चित्रातून प्रभावीपणे मांडलेला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘हास्यचित्रांतली मुलं’ या पाठातील ‘चिंटूच्या चित्रमालिका’ हे एक व्यंगचित्र दिलेले आहे. ते मला खूप आवडले आहे. त्यातील ‘पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो?’ हा चिंटूचा साधा प्रश्न मला पटकन कळलाच नाही. त्याने असे का विचारले असेल? याचा उलगडा मला लगेच झाला नाही. पण तिसऱ्या चित्रात बाबांनी विचारलेल्या ‘का रे?’ या प्रश्नाला चिंटूने दिलेल्या “तुमच्या स्कुटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय,” या अगदी निरागस, सहज उत्तराने मला त्याच्या प्रश्नाचा अर्थ कळला. उत्तर देताना चिंटूने फिरवलेला चेहरा, त्याचे बाबांकडे न पाहणे, डोळ्यातले निरागस भाव चटकन आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
व्यंगचित्र रेखाटण्यासाठी अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपली चित्रकलेवर हुकूमत असली पाहिजे. चित्रातल्या रेषा अत्यंत सफाईदारपणे काढता आल्या पाहिजेत. शिवाय बारीक निरीक्षणशक्ती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. आजूबाजूच्या माणसांच्या, जनावरांच्या, पशु-पक्षांच्या सवयी, त्यांच्या लकबी या सर्वांचे निरीक्षण व्यंगचित्रकाराला करता आले पाहिजेत.

त्याचबरोबर चित्रामधून एखादा विनोद, मांडता आला पाहिजे. असे चित्र पाहताना समोरच्या व्यक्तीला हसू आले पाहिजे. शिवाय त्याला विचार करायला भाग पाडले पाहिजे. म्हणजेच व्यंगचित्रकाराने अशा चित्रातून गमतीदार विचार मांडणे आवश्यक असते. त्यासाठी व्यंगचित्रकाराकडे विनोदबुद्धी असणे गरजेचे असते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
लहान मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे, केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं. फार कमी जणांना अशी लहान मुले चित्रित करणे जमते. लहान मुलाचं चित्र काढताना, त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हाता-पायांची बोटं लहान काढली की आपोआप नखं लहान होतात.

नाकाचा, ओठांचा आकार लहान काढल्यावर त्यांच्या डोळ्यांवरच्या भुवया तशाच लहान किंवा एकाच रेषेच्या होतात. शिवाय लहान मुलांना दाढी-मिश्या नसतात त्यामुळे त्या दाखविण्याची गरज पडत नाही. म्हणूनच लहान मुलांची हास्यचित्रे काढताना मोठ्या माणसांकडे आणि लहान मुलांकडे बारकाईने पाहणे, त्यांचे नीट निरीक्षण करणे आवश्यक ठरते.

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: मधुकर धर्मापुरीकर
कालावधी : 1954
परिचय: कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक-अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘अनकॉमन मॅन आर. के. लक्ष्मण’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी अॅण्ड फ्रेंडज’ या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. ‘अप्रपू’, ‘रूप’, ‘विश्वनाथ’, ‘चिनकूल’ हे कथासंग्रह, ‘रेषालेखक वसंत सरवटे’, ‘हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे’ ही पुस्तके प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

प्रस्तावना:

‘हास्यचित्रांतली मुलं’ हा पाठ लेखक ‘मधुकर धर्मापुरीकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेद दाखवत हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? ती कशी वाचायला पाहिजेत? हे अगदी रंजक पद्धतीने सांगितले आहे.

Writer ‘Madhukar Dharmapurikar has written this write-up named ‘Hasyachitrantali Mula’. He teaches us in an entertaining way how to enjoy the art of cartoons and caricatures and how to distinguish between the two.

शब्दार्थ:

  1. हास्यचित्र – हसू येण्यासारखे चित्र
  2. व्यंगचित्र – विनोदी चित्र (caricature, cartoon)
  3. भेदाभेद – भेदभाव (discrimination)
  4. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  5. बारकाईने – लक्षपूर्वक (with full attention)
  6. कौशल्य – कुशलता, कसब (skill)
  7. हेतू – उद्देश, उद्दिष्ट, कारण (intention, reason)
  8. विनोद – थट्टा, उपहास (jokes, humour, jesting)
  9. रोपटे – लहान कोवळे झाड (a plant)
  10. लवचीक – न मोडता वाकणारा (flexible)
  11. रांगणे – सरपटत जाणे (to creep, to crawl)
  12. नक्कल – अनुकरण (copy, imitation)
  13. हुबेहूब – अगदी सारखे (exactly the same)
  14. चतुर – धूर्त (shrewd)
  15. भाव – भावना (emotion)
  16. खेडे – लहान गाव (village)
  17. उत्साह – जोश, जोम, उमेद (enthusiasm, energy)
  18. उत्तम – चांगले, उत्कृष्ट (best, excellent)
  19. आकर्षण – मोहकता (attraction)
  20. भुवया – भिवई (eyebrow)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

टिपा:

1. चिंटू – सकाळ वृत्तपत्रातील एक विनोदी चित्रमालिका. याचे लेखन प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांनी केले आहे. चिंटू हे पात्र मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे. यात विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातल्या घटना दिल्या जातात.

2. शि. द. फडणीस – शिवराम दत्तात्रेय फडणीस (29 जुलै, 1925) भारतातील प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार.

3. डेव्हिड लँग्डन – (24 फेब्रुवारी, 1914 – नोव्हेंबर, 2011) त्याचे पहिले व्यंगचित्र 1935 मध्ये एलसीसी कर्मचारी जर्नल, लंडन टाउनमध्ये प्रसिद्ध झाले.

4. आर. के. लक्ष्मण – राशीपुरम कृष्णास्वामी अय्यर (24 ऑक्टोबर, 1921-26 जानेवारी, 2015) भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक. ते त्यांच्या ‘कॉमन मॅन’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ मधील ‘यू सेड इट’ या चित्रमालिकेसाठी प्रसिद्ध आहेत.

5. नॉर्मन थेलवेल – (23 मे, 1923 – 7 फेब्रुवारी, 2004), ब्रिटिश व्यंगचित्रकार. घोड्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध होते.

वाक्प्रचार:

  1. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  2. विचार मांडणे – कल्पना, मत मांडणे
  3. भोकाड पसरणे – जोरजोरात रडणे
  4. हुकूमत गाजवणे- वर्चस्व, अधिकार गाजवणे