Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ
5th Standard Marathi Digest Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Textbook Questions and Answers
1. ऐका. वाचा. म्हणा.
छोटेसे बहीणभाऊ,
उदयाला मोठाले होऊ.
उदयाच्या जगाला, उदयाच्या युगाला,
नवीन आकार देऊ.
ओसाड, उजाड जागा,
होतील सुंदर बागा,
शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना,
नवीन बहार देऊ.
मोकळ्या आभाळी जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ,
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन् घेऊ.
प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकच होऊ.
– वसंत बापट
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
छोटेसे बहीणभाऊ उदयाला कसे होणार आहेत?
उत्तरः
छोटेसे बहीणभाऊ उदयाला मोठे होणार आहेत.
प्रश्न 2.
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला काय देणारआहेत?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला नवीन आकार देणार आहेत.
प्रश्न 3.
कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत?
उत्तर:
ओसाड व उजाड जागा सुंदर बागा होणार आहेत.
प्रश्न 4.
छोटेसे बहीणभाऊ नवीन बहार कोणाकोणाला देणार आहेत?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ नवीन बहार शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना देणार आहेत.
प्रश्न 5.
छोटेसे बहीणभाऊ काय काय करणार आहेत?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ आभाळात जाऊन, मोकळ्या मनाने गाऊन, निर्मळ आनंद देणार आहेत.
प्रश्न 6.
छोटेसे बहीणभाऊ आनंद कसे देणार आहेत?
उत्तरः
छोटेसे बहीणभाऊ निर्मळ मनाने आनंद देणार आहेत.
प्रश्न 7.
छोटेसे बहीणभाऊ आपले नवीन जीवन कसे पाहणार आहेत?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ आपले नवीन जीवन निर्मळ मनाने व आनंदभराने पाहणार आहेत.
प्रश्न 8.
छोटेसे बहीणभाऊ कसे राहणार आहेत?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ प्रेमाने एकत्र राहणार आहेत.
प्रश्न 9.
छोटेसे बहीणभाऊ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तरः
छोटेसे बहीणभाऊ या कवितेचे कवी ‘वसंत बापट’ आहेत.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
छोटेसे ………………
उदयाला ……………
……………….. युगाला,
…………….. देऊ.
उत्तरः
छोटेसे बहीणभाऊ,
उदयाला मोठाले होऊ.
उदयाच्या जगाला, उदयाच्या युगाला,
नवीन आकार देऊ.
प्रश्न 2.
प्रेमाने ………………… ,
नवीन …………………,
………………, ………….. वेशांचे,
…………………………… होऊ.
उत्तरः
प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकच होऊ.
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगात कोणती गोष्ट करणार आहेत?
उत्तरः
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला, युगाला नवीन आकार देणार आहेत. ओसाड व उजाड जागांच्या सुंदर बागा करणार आहेत; तसेच शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना, नवीन बहार देणार आहेत.
प्रश्न 2.
छोटेस बहीणभाऊ या जगात कसे राहतील?
उत्तर:
छोटेसे बहीणभाऊ मोकळ्या आभाळाच्या खाली मोकळ्या गळ्याने गातील, निर्मळ मनाने एकमेकांना, आनंद देतील. व आनंद घेतील. प्रेमाने एकत्र राहून नवीन जीवन जगतील. अनेक देशांचे भाषांचे, वेशांचे असले तरी एकच होऊन राहतील.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
- छोटेसे
- भाऊ
- बाग
- गळा
- प्रेम
- मन
- बहीण – भगिनी
- जग
- आभाळ
- आनंद
- जीवन
- फूल
- जागा
- एकत्र
- वेश
- भाषा
- निर्मळ
उत्तर:
- लहानसे
- बंधू
- उदयान
- कंठ
- माया, ममता
- अंत:करण
- भगिनी
- विश्व
- आकाश
- हर्ष
- आयुष्य
- पुष्प
- ठिकाण
- एकी
- पोशाख
- वाणी
- स्वच्छ
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- नवीन
- सुंदर
- प्रेम
- एक
- उजाड
- छोटेसे
- आनंद
- देश
- उदया
- काल
- मोकळा
- जीवन
- निर्मळ
- घेणे
उत्तरः
- जुने
- कुरूप
- द्वेष
- अनेक
- बागायती
- मोठेसे
- दुःख
- विदेश
- आज
- परवा
- बंद
- मरण
- मलीन
- देणे
प्रश्न 3.
वचन बदला.
- बाग
- फूल
- फळ
- शेत
- मळे
- देश
उत्तर:
- बागा
- फुले
- फळे
- शेते
- मळा
- देश
प्रश्न 4.
लिंग बदला.
- मुलगा
- आई
- भाऊ
उत्तर:
- मुलगी
- वडील
- बहीण
प्रश्न 5.
जोडाक्षरे लिहा.
- उ+ द् + या
- नि + र + म + ळ
- त + ऊ + म् + हा + ल + आ
- व + आ + क् + य
- ए + क + त् + र
उत्तर:
- उदया
- निर्मळ
- तुम्हाला
- वाक्य
- एकत्र
छोटेसे बहीणभाऊ Summary in Marathi
पदयपरिचय:
‘छोटेसे बहीणभाऊ’ या कवितेतून कवी वसंत बापट यांनी एकता व समानता याचा संदेश दिला आहे. येणारा उदया हा मोकळ्या श्वासाचा, समृद्ध असा असेल, असा विश्वास कवी येथे व्यक्त करतात.
शब्दार्थ:
- बहीण – भगिनी (sister)
- भाऊ – बंधू (brother)
- मोठाले – वयाने मोठे (elder)
- आकार – स्वरूप (shape)
- ओसाड – उजाड (barren)
- बहार – ताजे, टवटवीत blossom
- निर्मळ – पवित्र (pure)
- एकत्र – एकोप्याने (together)
- युग – फार मोठा कालखंड (long period of time)
- एक होऊ – एकत्र होऊ (will be united)
- वेश – पोशाख (costume)
- जीवन – आयुष्य (life)
- छोटेसे – लहानसे (little ones)