Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15 खोद आणखी थोडेसे (कविता) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 15 खोद आणखी थोडेसे (कविता)

Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 15 खोद आणखी थोडेसे Textbook Questions and Answers

कृति – स्वाध्याय व उत्तरे

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…

प्रश्न 1.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
(अ) ‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे…… – (आ) गाणे असते मनी म्हणजे ……
(१) विहीर आणखी खोदणे. – (१) मन आनंदी असते.
(२) जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. – (२) गाणे गाण्याची इच्छा असते.
(३) घरबांधणीसाठी खोदणे. – (३) मनात नवनिर्मिती क्षमता असते.
(४) वृक्षलागवडीसाठी खोदणे. – (४) गाणे लिहिण्याची इच्छा असते.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे 4
उत्तर:
(i) उघडून ओंजळीत
(ii) जन्माचे आर्त
(iii) स्वत:चे ओठ
(iv) लाहो.

प्रश्न 3.
कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संकल्पना – संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी – (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ – (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली – (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी – (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

प्रश्न 4.
कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) संयमाने वागा
(२) सकारात्मक राहा
(३) उतावळे व्हा
(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा
(५) नकारात्मक विचार करा
(६) खूप हुरळून जा
(७) संवेदनशीलता जपा
(८) जिद, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा
(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा
(१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा
(११) धीर सोडू नका
(१२) यशाचा विजयोत्सव करा
उत्तर:
(i) संयमाने वागा – [योग्य]
(ii) सकारात्मक राहा – [योग्य]
(iii) उतावळे व्हा – [अयोग्य]
(iv) चांगुलपणावर विश्वास ठेवा – [योग्य]
(v) नकारात्मक विचार करा – [अयोग्य]
(vi) खूप हुरळून जा – [अयोग्य]
(vii) संवेदनशीलता जपा – [योग्य]
(viii) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा – [योग्य]
(ix) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा – [अयोग्य]
(x) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा – [योग्य]
(xi) धीर सोडू नका – [योग्य]
(xii) यशाचा विजयोत्सव करा – [अयोग्य]

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य: कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो, तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये: साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘झरा’ या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

(आ) ‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.
उत्तर:
फवयित्री sal काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे. कवयित्री म्हणतात – घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे, हे समजावताना त्यांनी ‘गळणाऱ्या पानाचे’ प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते, त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते.

गळणाऱ्या पानामघून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

(इ) ‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
उत्तर:
आसावरी काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितिक्षमतेला आवाहन केले आहे.

कवयित्रींच्या मते – मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत, धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते, मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा.

मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग ‘आनंदाचे डोही। आनंद तरंग।’ ही अवस्था अनुभवता येईल.

अशा प्रकारे कवयित्रींनी ‘गाणे असते गं मनी’ या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

(ई) ‘परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही’, याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
उत्तर:
आमचे ‘बाभूळगाव’ हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय! डोंगरझाडी व बिकट मार्ग त्यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विदयार्थ्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विदयार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला, पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या १५ ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षणव्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि.प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला ‘परिश्रमाचे फळ ‘ मिळाले! किंवा

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या
सूचनांनुसार कृती करा:

कृती १: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
(i) सारी खोटी नसतात …………………………..
(१) गाणी
(२) म्हणी
(३) नाणी
(४) वाणी.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे 2

(ii) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली …………………………..
(१) जाळी
(२) तळी
(३) ओळी
(४) झोळी.
उत्तर:

(iii) उमेदीने जगण्याला ………………………….. लागते थोडेसे!
(१) बळ
(२) कळ
(३) वळ
(४) झळ.
उत्तर:

कृती ३: (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
उमेदीने जगण्याला बळ लागतेच थोडेसे’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. (सराव कृतिपत्रिका-१)
उत्तर:
‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमध्ये कवयित्रींनी माणसाने प्रयत्नवादी होऊन उमेदीने जीवन जगावे, हा सकारात्मक विचार मांडला आहे.

जगत असताना माणसाने कधीही निराश होऊ नये. स्वतःवर विश्वास ठेवून अथक प्रयत्न करावेत. प्रयत्नानंतर यश हमखास मिळेलच ! ओठ दाबून दुःख सहन करू नये. दुःख सरेल हा आशावाद बाळगावा. मनात सकारात्मक तळी असतात. ती खोदावीत. अखेर निर्मळ झरा लागतोच ही उमेद मनात हवी. जिद्दीने परिस्थितीवर मात करता येते, त्यासाठी आत्मबळ हवे. समृद्ध जगण्यासाठी सतत प्रयत्नवादी राहायला हवे.

अशा प्रकारे या ओळींमधून कवयित्रीने जीवनातील सकारात्मक आशावाद मांडला आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी…
प्रश्न. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडता:

कविता-खोद आणखी थोडेसे.
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेच्या कवयित्री: आसावरी काकडे.
(२) कवितेचा रचनाप्रकार: अष्टाक्षरी ओवी.
(३) कवितेचा काव्यसंग्रह: लाहो.
(४) कवितेचा विषय: प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व,

(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: चिकाटी, जिद्द, आशावाद यांमुळे मनाला उमेद लाभते.

(६) कवितेच्या कवयित्रींची लेखनवैशिष्ट्ये: प्रत्येक चरणात आठ अक्षरे, दुसऱ्या व चौथ्या चरणांत यमक आणि प्रत्येक कडव्यात चार चरण अशी या ओवीची रचना असते. कवितेला आपोआपच गेयता लाभली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘सारी खोटी नसतात नाणी’ या शब्दांतून आशावाद व्यक्त होतो. संपूर्ण कविताच आशावादाने भारलेली आहे. ‘मरणाचे कष्ट घ्या’, ‘प्राण गेले तरी चालेल’ अशा शब्दांतून प्रयत्न करायला सांगितले तर दडपण येते. ‘जरासा प्रयत्न कर, थोडेसे कष्ट घे’, असे सांगितले की माणूस कष्ट करायला सिद्ध होतो. या कवितेतील प्रत्येक कडव्यातील शेवटच्या दोन ओळी मनात अशी उमेद निर्माण करतात.

(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी यांच्या योगे ध्येय साध्य करण्यास सिद्घ व्हावे, हा विचार या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. जीवनात अपयश येण्याच्या, निराशा येण्याच्या घटना खूप घडतात. माणसे त्यामुळे कोलमडून जातात. असे कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच, याची मनोमन खात्री बाळगावी, असा आशावाद ही कविता जागवत राहते.

(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: जीवनात खूप कष्ट. उपसावे लागतात, तरीही अनेकदा यश हुलकावणी देते. कधीही प्रयत्न केल्याबरोबर वा कष्ट घेतल्याबरोबर लागलीच यश मिळत नसते. माणसे त्यामुळे नाउमेद होतात. असे माणसाने कधीच नाउमेद होऊ नये. सतत प्रयत्न करीत राहावे. आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी, असा विचार या कवितेतून व्यक्त केला आहे.

(९) कवितेतील आवडलेली ओळ:
झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे !

(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता मला खूप खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळभ दूर होते. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे, हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते.

(११) कवितेतून मिळणारा संदेश: आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो. खरे तर सदोदित अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये, थोड्याशा प्रयत्नानेही यश मिळेल, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. जग अगदीच वाईट नाही; किंवा सगळीकडे वाईटपणा वा खोटेपणाच भरलेला आहे, असे मानू नये. प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असा संदेश या कवितेतून मिळतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:

१. समास:
पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा:
(i) दहाबारा
(ii) राजवाडा
(iii) चिल्लीपिल्ली
(iv) दशदिशा
(v) विटीदांडू
(vi) गैरहजर.
उत्तर:
(i) दहाबारा – वैकल्पिक द्वंद्व
(ii) राजवाडा – विभक्ती तत्पुरुष
(iii) चिल्लीपिल्ली – समाहार वंद्व
(iv) दशदिशा – द्विगू
(v) विटीदांडू – इतरेतर द्वंद्व
(vi) गैरहजर – अव्ययीभाव.

२. अलंकार:
पुढील ओळींतील अलंकार ओळखून स्पष्टीकरण लिहा:
पावसाळी ढग आलं डोंगराच्या मागं
झाडं झाली वेडीपिशी खुळी लगबगं
उत्तर:
अलंकार: हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

स्पष्टीकरण: पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची कामे करण्याची लगबग सुरू होते. तशी काळे ढग पाहून झाडांची खुळी लगबग सुरू झाली आहे. झाडांवर मानवी भावनांचे आरोपण केल्यामुळे हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

३. वृत्त:
‘वसंततिलका’ या वृत्ताची लक्षणे सांगून उदाहरण दया.
उत्तर:
लक्षण: हे एक अक्षरगणवृत्त आहे.
चार चरण, प्रत्येक चरणात १४ अक्षरे
गण – त भ ज ज ग ग
यति – ८ व्या अक्षरावर.
उदाहरण: आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

४. शब्दसिद्धी:
(i) ‘अभि’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
[ ] [ ] [ ] [ ]

(ii) ‘आई’ हा प्रत्यय लागलेले चार शब्द तयार करा:
जसे: खोद + आई → खोदाई
उत्तर:
(i) [अभिनंदन] [अभिरुची] [अभिमान] [अभिनय]
(ii) [शिलाई] [घुलाई] [चराई] [उजळाई]

५. सामान्यरूप:
• पुढील शब्दांचे सामान्यरूप लिहा:
(i) जन्मांचे
(ii) ओंजळीत
(iii) उमेदीने
(iv) जगण्याला.
उत्तर:
(i) जन्मांचे – जन्मां
(ii) ओंजळीत – ओंजळी
(ii) उमेदीने – उमेदी
(iv) जगण्याला – जगण्या.

६. वाक्प्रचार:
योग्य अर्थ निवडा:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे 3
उत्तर:
उमेदीने जगणे → जिद्दीने जगणे

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

भाषिक घटकांवर आधारित
कृती: १. शब्दसंपत्ती:

(१) विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) थोडेसे x ……………………..
(ii) खोटी x ……………………..
(iii) घट्ट x ……………………..
(iv) रिते x ……………………..
उत्तर:
(i) थोडेसे x जास्त
(ii) खोटीx खरी
(iii) घट्ट x सैल
(iv) रिते x भरलेले.

(२) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा:
(i) मनातली → [ ] [ ] [ ] [ ]
(ii) नसतात → [ ] [ ] [ ] [ ]
उत्तर:
(i) मनातील → [मत] [तम] [मनात] [नात]
(i) नसतात → [नस] [तान] [तन] [ताता]

(३) समानार्थी शब्द लिहा:
(i) झरा = ……………………….
(ii) उमेद = ……………………….
(iii) पान = ……………………….
(iv) गाणे = ……………………….
उत्तर:
(i) झरा = निर्झर
(iii) पान = पर्ण
(ii) उमेद = जिद्द, आशा
(iv) गाणे = गीत.

(४) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा:
(i) [ ] ← तळी → [ ]
(ii) [ ] ← अंबर → [ ] (मार्च १९)
उत्तर:
(i) [तळाला] ← तळी → [तलाव]
(ii) [गगन] ← अंबर → [वस्त्र] (मार्च १९)

२. लेखननियम:
अचूक शब्द निवडून लिहा:
(i) जिवनध्येय/जीवनधेय/जीवनध्येय/जीवनधेय्य.
(ii) विश्लेषण/विश्लेशण/वीश्लेषण/विश्लेषन.
उत्तर:
(i) जीवनध्येय
(ii) विश्लेषण.

३. विरामचिन्हे:
पुढील ओळीतील विरामचिन्हे ओळखा:
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.
उत्तर:
(i) [ , ] स्वल्पविराम
(ii) [ . ] पूर्णविराम.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 15 खोद आणखी थोडेसे

४. पारिभाषिक शब्द:
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
उत्तर:
(i) Zero Hour – शून्य तास
(ii) Unauthorized – अनधिकृत
(iii) Souvenir – स्मरणिका
(iv) Lesson Note – पाठ टिपणी

५. अकारविल्हे / भाषिक खेळ:
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लावा:
(i) झरा → खोद → उमेद → आणखी.
(ii) बळ → गाणे → घट्ट → पाणी.
उत्तर:
(i) आणखी → उमेद → खोद → झरा.
(ii) गाणे → घट्ट → पाणी → बळ.

खोद आणखी थोडेसे Summary in Marathi

खोद आणखी थोडेसे कवितेचा भावार्थ

सकारात्मक (पॉझिटिव्ह) जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे असावे, हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात –

निराश होऊ नकोस. जमीन खणत राहा. आणखी थोडेसे खोद. जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर. जीवन जगताना हिंमत सोडू नको. सर्व माणसे स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसेही (खरी नाणी) जगात असतात, हा विश्वास मनात असू दे.

ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस. अबोलपणे वेदना सहन करू नकोस. आत खोल मनात प्रत्येकाचे एक आनंदी गाणे दडलेले असते. ते शोध. (शिशिरात) झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते. (ते गळताना दुःख करीत नाही. पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडते.)

मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेलीच आहे, असे म्हणू नये, म्हणजे स्वत:कडे काही सत्ता, संपत्ती, वैभव नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवू नये. जे नाही त्याची हाव धरू नये. उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करावा, मनात जो ओलावा आहे, त्याच्यामध्ये आनंद घ्यावा. तीच आपली समृद्धी समजावी.

खोलवर आणखी थोडे मातीत खण म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागेल, तीच तुझी जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. प्रयत्नवादी राहणे आवश्यक आहे.

खोद आणखी थोडेसे शब्दार्थ

  • खोदणे – उकरणे, खणणे, खड्डा करणे.
  • सारी – सर्व.
  • नाणी – शिक्के, पैसे.
  • आर्त – वेदना.
  • रित्या – रिकाम्या, ओसाड,
  • पानी – पानावर.
  • तळी – तलाव,
  • उमेद – जिद्द.
  • बळ – शक्ती.

खोद आणखी थोडेसे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • धीर न सुटणे : हिंमत न हारणे.
  • उमेदीने जगणे : जिद्दीने जीवन कंठणे.
  • मूठ भरलेली असणे : जीवनात वैभव, सुख असणे.