Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Textbook Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 1

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 1
उत्तर:
पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा:
1. सोसाट्याचा वारा
2. मातीचा सुगंध

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

2. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 2

प्रश्न 1.
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 2

उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 3

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

3. खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
अ. जिगरबाज भटके – वरंधा घाटात बघावयास मिळणारे निसर्गाचे विहंगम दृश्य व टपऱ्यांवर मिळणारा राजेशाही खाना यांबरोबर कावळ्या किल्ला वरंधा घाटात सज्ज आहे. मात्र ह्या किल्ल्यावर ट्रेक करताना अरूंद पायवाट, अरूंद सपाटी, उतरण-चढणीचा रस्ता हृदयाची धडधड वाढवतो. डेअरिंग करणाऱ्या, न घाबरता ट्रेक करणाऱ्या प्रवाशांना जिगरबाज भटके म्हटले आहे.

आ. रंगिली पायवाट – श्री वाघजाई मंदिराच्याबरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ असणाऱ्या टाक्या काळ्याशार पाषाणात खोदलेल्या आहेत. या टाक्यांच्या पाण्यामुळे तेथील पायवाट ओली झाली आहे. त्यामुळे त्या ओल्या वाटेने जाताना घसरून पडल्यामुळे वा चिखल अंगावर उडाल्यामुळे कपडे रंगतात. म्हणूनच या पायवाटेला रंगिली पायवाट म्हणतात.

इ. डोंगराची सोंड – उंच डोंगराच्या माथ्यावरील शेवटच्या टप्प्याला डोंगराची सोंड असे म्हणतात.

4. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

प्रश्न अ.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
वरंधा घाटातील निसर्गाची वेगळीच जादू बघायला मिळते. वरंधा घाटातून दिसणारे निसर्गाचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. हिरव्यागार झाडांनी भरलेल्या कपारीतून धबधबे जोरदार आवाज करत वाहत असतात. दरीतील हिरवे रान डोळ्यांना सुखद गारवा देते. डोंगरावर ढग उतरल्यामुळे ढगांवर पांढरे आच्छादन घातल्यासारखे वाटते. पावसाची संततधार वातावरणात उत्साह निर्माण करते, धबधब्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर जास्त असल्याने ते पाणी जणू दगडांवर चाबूक मारत पुढे जात असल्यासारखे वाटते. निसर्गाचे हे सुंदर दृश्य नजरेचे पारणे फेडून टाकते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न आ.
कावळ्या किल्ला
उत्तर:
कावळ्या किल्ला – वरंधा घाटातल्या डोंगरमाथ्याजवळील नऊ टाक्यांच्या समूहापासून ओल्या पायवाटेने पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताची पायवाट कावळ्या किल्लाकडे जाते, बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून कावळ्या किल्ल्यावर ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेत पसरलेल्या डोंगरावरून डावीकडे कोकणात उतरत जाणाऱ्या रस्त्यावरून पाय सटकला तर थेट समर्थांच्या शिवथरघळीत माणूस पोहचतो.

तेथून पुढे जाणारी अरूंद पायवाट सपाटीवर येऊन थांबते. तिथून एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते व तेथून वरंधा घाटाचे दर्शन घडते, डोंगराच्या सोंडेला शेवटी जोत्याचे अवशेष व ढासळलेल्या बुरूजाचे अवशेष दिसतात. हा कावळ्या किल्ला जिगरबाज भटक्यांसाठी आवडीचा ठरतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

खेळूया शब्दांशी.

(आ) खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 4

प्रश्न 1.
खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 4
उत्तर:

विशेषण विशेष्य
1. विहंगम दृश्य
2. गरमागरम कांदाभजी
3. घोंघावणारा वारा
4. काळाशार पाषाण
5. अरूंद पायवाट

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.

प्रश्न अ.
पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.
उत्तर:
शब्दयोगी अव्यये – कडे, वर

प्रश्न आ.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
उत्तर:
शब्दयोगी अव्यय – सारखी

प्रश्न इ.
जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
उत्तर:
शब्दयोगी अव्यय – साठी

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

(इ) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. 

प्रश्न अ.
घाटात घाट वरंधाघाट बाकी सब घाटियाँ !
उत्तरः
! – उद्गारवाचक चिन्ह

प्रश्न आ.
गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात,
उत्तर:
‘_’ एकेरी अवतरण चिन्ह. . पूर्ण विराम.

चर्चा करूया.

वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

प्रश्न 1.
वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

शोध घेऊया

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

बातमी लेखन

दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी. व्ही., रेडिओ यांसारख्या माध्यमांतून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते.

बातमी लेखनासाठी आवश्यक गुण

  1. लेखन कौशल्य.
  2. भाषेचे उत्तम ज्ञान.
  3. व्याकरणाची जाण.
  4. सोपी, सुटसुटीत वाक्यरचना.
  5. चौफेर वाचन.

बातमीची विविध क्षेत्रे : सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, दैनंदिन घटना.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक : 20 डिसेंबर

लोकप्रतिभा
चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 ते 7.00 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.
या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

1. कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

2. उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थीची संख्या
(आ) शिबिरार्थीनी शिबिरात शिकलेली कला
(इ) शिबिराचे ठिकाण
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख

3. वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 5

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 6

प्रश्न 2.
कोण ते लिहा
उत्तर:

  1. भिजल्याबद्दल मार देणारे – [आईवडील]
  2. कागदी होड्या करायला शिकवणारे – [आजी – आजोबा]
  3. पावसात चिंब भिजणारे – [लेखक]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी …………….. येत असे. (हिवाळा, ऊन्हाळा, पाऊस, ज्येष्ठ)
  2. मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात असणाऱ्या रंगांचे अर्थ ………………… लागतात. (उमगू, कळू, समजू, जाणवू)
  3. असं बरंच काही अनुभवायंच असेल तर ………………घाट गाठलाच पाहिजे. (माळशेज, ताम्हिणी, वरंधा, कुंभार्ली)

उत्तर:

  1. पाऊस
  2. उमगू
  3. वरंधा

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखक बालपणी कोणत्या कवितेच्या तालावर पावसात भिजत असत?
उत्तर:
लेखक बालपणी ‘ये गं ये गं सरी, माझे मडके भरी’ या कवितेच्या तालावर पावसात भिजत असत.

प्रश्न ii.
पावसाचे वेध कधी लागतात?
उत्तर:
ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात.

प्रश्न iii.
पावसाळ्यात प्रत्येक वर्षी येणाऱ्या, तरीही दरवेळी नवीन वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या?
उत्तर:
सोसाट्याचा वारा व मातीचा सुगंध या गोष्टी पावसाळ्यात प्रत्येक वर्षी येतात, तरीही दरवेळी नवीन वाटतात.

प्रश्न 2.
खालील प्रसंगानंतर काय घडले ते लिहा. लेखक पावसात चिंब भिजले.
उत्तर:
लेखक पावसात चिंब भिजल्यामुळे त्यांनी आई वडिलांकडून पोटभर मार खाल्ला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
कारणे शोधा.
लेखक पावसाची आतुरतेने वाट पाहत असत; कारण…
उत्तर:
पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटत असतानाच आजी-आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी लेखक पावसाची आतुरतेने वाट पाहत असत.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. वेध लागणे – एखाद्या गोष्टीकडे लक्ष लागणे.
वाक्य: उन्हाळा सुरू होताच सगळ्यांना आंब्याचे वेध लागतात.

2. पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे.
वाक्यः अभ्यास न केल्यामुळे राजूने गुरूजींचा पोटभर मार खाल्ला.

3. आतुरतेने वाट पाहणे – मनापासून वाट पाहणे.
वाक्य: तब्बल दोन वर्षांनी परदेशातून घरी येणाऱ्या आपल्या मुलाची राधाबाई आतुरतेने वाट पाहत होत्या.

4. प्रत्यय येणे – अनुभव येणे
वाक्यः आमच्या शेजारी झालेल्या चोरीचा निकाल पोलिसांनी दोन दिवसात लावल्याने त्यांच्या तत्पर कार्याचा प्रत्यय आला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
खालील इंग्रजी शब्दांसाठी उताऱ्यात आलेले मराठी शब्द शोधा.

  1. मंथ
  2. रेन्बो
  3. मोमेंट
  4. पास्ट

उत्तर:

  1. महिना
  2. इंद्रधनुष्य
  3. क्षण
  4. गतकाळ

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुगंध × …………
  2. आगमन × …………
  3. गतकाळ × …………..
  4. जिवंत × ………….

उत्तर:

  1. दुर्गध
  2. निर्गमन
  3. भविष्यकाळ
  4. मृत

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
महिना, माती, वारा, मडके, होडी, पाऊस, इंद्रधनुष्य, क्षण, पापणी, घाट

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
महिना माती मडके
वारा होडी इंद्रधनुष्य
पाऊस पापणी क्षण
घाट

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 5.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. महिना – [ ]
  2. सरी – [ ]
  3. होडी – [ ]
  4. रंग – [ ]

उत्तर:

  1. महिने
  2. सर
  3. होड्या
  4. रंग

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
‘पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.’ या वाक्यातील ते क्षण यामधून काय अभिप्रेत होते?
उत्तर:
लेखक व पावसाळा यांचे एक वेगळे नाते आहे. दरवर्षी पाऊस येत असला तरी लेखकाला तो दरवर्षी नवीन वाटतो. बालपणीच्या साऱ्या आठवणी लेखकाच्या डोळयासमोर येत राहतात. मोठे झाल्यावर पावसाचा, इंद्रधनुष्याचा अर्थ वेगळा उमगू लागला असला तरी लेखकाच्या गतकाळातील पावसाच्या आठवणी बदलत नाहीत. बालपणीच्या या सर्व कडू-गोड आठवणी ‘ते क्षण’ या शब्दांमधून अभिप्रेत होतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
‘मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही.’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ सांगा.
उत्तर:
पावसाशी वेगळे नाते सांगणाऱ्या लेखकाच्या अनेक आठवणी या पावसाशी निगडीत आहेत. लहानपणी खाल्लेला मार ते मोठे झाल्यावर पावसाचा उमगू लागलेला वेगळा अर्थ यांमधील लेखकाचा प्रवास आठवणींमध्ये साठवलेला आहे. पावसाचे आगमन होताच त्या साऱ्या आठवणी जिवंत होतात व अणूंच्या रूपाने वाहू लागतात. अशावेळेस मनातील पाऊस व बाहेरील पाऊस एकरूप होतात. पावसाचे पाणी की डोळ्यांमधील पाणी हेच कळेनासे होते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 7

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 8

कंसातली योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
i. मनाला ……………….. देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. (प्रसन्नता, चैतन्य, उभारी, नवजीवन)
ii. निसर्गाचे ………………….. दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते. (अप्रतिम, विहंगम, विलोभनीय, अवर्णनीय)
उत्तर:
i. उभारी
ii. विहंगम

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

एका वाक्यात उत्तरे दया.

प्रश्न i.
पावसाळ्यात प्रवास करण्याची मजा कोणत्या प्रकारच्या गाडीत जास्त येते?
उत्तर:
पावसाळ्यात प्रवास करण्याची मजा बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यापेक्षा दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात जास्त येते.

प्रश्न ii.
वरंधा घाटात आल्यावर काय वाटते?
उत्तर:
‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वरंधा घाटात आल्यावर वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न iii.
प्रवासात कुठून कुठे जाताना वरंधा घाट लागतो?
उत्तरः
पुण्याहून महाडकडे जाताना वरंधा घाट लागतो.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर:

  1. हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे – [धबधबे]
  2. दगडांवर आसूड मारत धावणारे [खळाळत वाहणारे पाणी]
  3. नजरेचे पारणे फेडून टाकणारे [निसर्गाचे विहंगम दृश्य]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
का ते लिहा.
वरंधा घाटात आल्यावर ‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वाटते.
उत्तर:
वरंधा घाटात पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतले हिरवे रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी असे नजरेचे पारणे फेडून टाकणाऱ्या निसर्गाच्या विहंगम दृश्याकडे पाहून ‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वाटते.

कृती 3 : व्याकरण कृती.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे विभक्तीप्रत्यय सांगून विभक्ती ओळखा.
उत्तर:

शब्द विभक्तीप्रत्यय विभक्ती
पुण्याहून हुन पंचमी एकवचन
रंगाची ची षष्ठी एकवचन
मनाला ला चतुर्थी एकवचन

प्रश्न 2.
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न i.
असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते.
उत्तरः
शरीर – सामान्यनाम, आणि – उभयान्वयी अव्यय, वाटते – क्रियापद

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न ii.
असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते.
उत्तर:
विहंगम – विशेषण, समोर – शब्दयोगी अव्यय, अन् – उभयान्वयी उव्यय

प्रश्न 3.
योग्य जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
1. आवडती (अ) वारा
2. बेफाम (आ) रान
3. हिरवं (इ) गाणी
4. कुंद (ई) वातावरण

उत्तर:

विशेषण विशेष्य
1. आवडती (इ) गाणी
2. बेफाम (अ) वारा
3. हिरवं (आ) रान
4. कुंद (ई) वातावरण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. झाड – [ ]
  2. चाक – [ ]
  3. दगड – [ ]
  4. दृश्ये – [ ]

उत्तर:

  1. झाडे
  2. चाके
  3. दगड
  4. दृश्य

कृती 4 स्वमत

प्रश्न 1.
बंदिस्त चारचाकी गाडीपेक्षा दोनचाकी गाडीवर पावसाळ्यात प्रवास करणे आल्हाददायक असते का? तुम्हाला काय वाटते?
उत्तरः
पावसाळ्यात दोनचाकी गाडीवरून प्रवास करताना अधिक आल्हाददायक वाटते. हिरव्या नवलाईने नटलेले डोंगर डोळे भरून पाहता येतात. पावसाचे थंड तुषार चेहऱ्यावर झेलत प्रवास करण्यास अधिक मजा येते. थंड वाऱ्याची झुळूक मनस्थिती बदलून टाकते. हवे तिथे उभे राहून पावसाचा आनंद घेत निसर्गाची सुंदरता डोळ्यांत साठवता येते. म्हणूनच मला पावसाळ्यात दोन चाकीने प्रवास करणे जास्त आल्हाददायक वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 13

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. पावसाळी वातावरणातील चमचमीत मेनू – [ ]
  2. जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज किल्ला – [ ]
  3. काळ्याशार पाषाणात खोदलेली गोष्ट – [ ]

उत्तरः

  1. पावसाळी वातावरणातील चमचमीत मेनू – [भजी, वडे, चहा]
  2. जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज किल्ला – [कावळ्या किल्ला]
  3. काळ्याशार पाषाणात खोदलेली गोष्ट – [पाण्याची टाकी]

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा कसा तयार केला आहे?
उत्तर:
बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला फोडून वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
नऊ टाक्यांचा समूह कोठे आहे?
उत्तर:
श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ नऊ टाक्यांचा समूह आहे.

प्रश्न 3.
पायवाटच रंगिली असल्याने काय घडते?
उत्तर:
पायवाटच रंगिली असल्याने त्या ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात.

कृती 2 : आकलन कृती

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा …………………खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. (उत्कृष्ट, राजेशाही, बढिया, गरमागरम)
2. …………….. पाषाणात खोदलेली पाण्याची टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असते. (काळ्याशार,काळ्याकुट्ट,काळ्याभोर,काळ्याकुळकुळीत)
उत्तर:
1. राजेशाही
2. काळ्याशार

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत वेळ कसा जातो ते का कळत नाही?
उत्तरः
बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत भजी-वडे-चहाचा आस्वाद घेत, रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकतं, विजेचं लखकन् चमकणं, अन् कडाडणं, मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत वेळ कसा जातो ते कळत नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
कावळ्या किल्ला कोणासाठी सज्ज आहे?
उत्तरः
बरसणारा पाऊस पाहत बराच वेळ गेल्यानंतर थोडे भिजावेसे वाटणाऱ्यांसाठी, पाय मोकळे करावेसे वाटणाऱ्यांसाठी, थोडं डेअरिंग करावसं वाटणाऱ्यांसाठी, जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.

योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

अ गट ब गट
1. वरंधा घाटातील (अ) कावळ्या किल्ला सज्ज टपऱ्या
2. जिगरबाज भटके (आ) नऊ टाक्यांचा समूह
3. डोंगरमाथा (इ) भजी-बडे-चहा

उत्तर:

अ गट ब गट
1. वरंधा घाटातील (इ) भजी-बडे-चहा
2. जिगरबाज भटके (अ) कावळ्या किल्ला सज्ज टपऱ्या
3. डोंगरमाथा (आ) नऊ टाक्यांचा समूह

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखून लिहा.

  1. हार्ट डिस्क / हारट डिस्क / हार्ट डीस्क / हार्ट डिस्क्
  2. डेयरिंग / डेअरिंग / डेअरींग / डेयरींग

उत्तर:

  1. हार्ट डिस्क
  2. डेअरिंग

प्रश्न 2.
खालील शब्दांचे सामान्यरूप लिहा.

  1. घाट
  2. टपरी
  3. वातावरण
  4. रानवारा

उत्तर:

  1.  घाटा
  2. टपऱ्या
  3. वातावरणा
  4. रानवाऱ्या

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. वीज – [ ]
  2. शेवटचा – [ ]
  3. पाणी – [ ]
  4. पाषाण – [ ]
  5. तहान – [ ]
  6. किल्ला – [ ]

उत्तर:

  1. विद्युत
  2. अंतिम
  3. जल, जीवन, नीर
  4. दगड
  5. तृष्णा
  6. गड

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
भजी-वडे-चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या दहा-पंधरा मिनिटातच इथे जाऊन पोहोचता येते.
उत्तर:
भजी-वडे-चहाच्या टपरीच्या बाजूने अवघ्या दहा-पंधरा मिनिटातच इथे जाऊन पोहोचता येते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे.
उत्तर:
काळ्याशार पाषाणात खोदलेल्या पाण्याच्या त्या टाक्या कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे,

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही भेट दिलेल्या एका किल्ल्याची माहिती दया.
उत्तरः
आमच्या शाळेच्या सहलीत रायगड या किल्ल्यावर जाण्याचा योग आला. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासात त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान व महत्त्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेकही याच किल्ल्यात झाला.

सागरी दळणवळणासही हा किल्ला उपयुक्त होता. अशा या रायगडावर फिरताना सगळा इतिहास समोर उभा राहिला. रायगडाचं जुनं नाव रायरी होतं. या गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला शिवरायांचा पुतळा पाहून आम्हा सगळ्यांनाच एक स्फुरण चढले. अशा प्रकारे त्या भेटीत रायगडाचा सहवास घडला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 10

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 11

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. परत एकदा आपण ………….. रस्त्यावर येतो. (दगडी, डांबरी, मातीच्या, कच्च्या)
  2. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरूंद पायवाट एका .. ….. येऊन थांबते. (झाडापाशी, सपाटीवर, उंचीवर, कड्यावर)
  3. कोकणातला ………. पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं. (समुद्र, मेवा, पाऊस, निसर्ग)

उत्तर:

  1. डांबरी
  2. सपाटीवर
  3. निसर्ग

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेपासून ट्रेक कसा सुरू होतो?
उत्तर:
किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेपासून बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
वरंधा घाटाच्या कोकणात उतरत जाणाऱ्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून पाय घसरला तर काय होते?
उत्तर:
वरंधा घाटाच्या कोकणात उतरत जाणाऱ्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून पाय घसरला, तर थेट समर्थांच्या शिवथरघळीत माणूस पोहोचतो.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 12

उत्तर लिहा.

प्रश्न 1.
वरंधा घाटाचे मस्त दर्शन कोठून घडते?
उत्तरः
डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरूंद पायवाट एका अरूंद सपाटीवर येऊन थांबते. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडे बाजूला करत शेवटी एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते. तिथूनच वरंधा घाटाचे मस्त दर्शन घडते.

प्रश्न 2.
खालील प्रसंगांनंतर काय घडते ते लिहा.
परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो.
उत्तरः
परत एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते.

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

प्रश्न 1.
इथून पाय सटकला, कि थेट समर्थांच्या शिवथरघळीत!
उत्तरः
(,) = स्वल्पविराम, (!) = उद्गारवाचक चिन्ह.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
निसर्गगीत अनुभवायला हवं.
उत्तरः
(.) = पूर्णविराम

प्रश्न 3.
खालील शब्दांचे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सर्वांमध्ये वर्गीकरण करा.. डांबरी, किल्ला, स्थिरावते, बांधीव, आपण, दिसतात, अरूंद, ते, पायवाट
उत्तर:

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
किल्ला आपण डांबरी स्थिरावते
पायवाट ते बांधीव दिसतात
अरूंद

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 4.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. काळजात लख्ख होणे – मनात भीती दाटून येणे.
वाक्य: पावसाचा रौद्र अवतार पाहून मुंबईकरांच्या काळजात लख्ख झाले.

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्य रूप
हाताच्या हात हाता
कोकणात कोकण कोकणा
पायवाटेवरून पायवाट पायवाटे
वळवायला वळवणे वळवाय

खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. सावध × ………..
  2. शांत × ………….
  3. अरूंद × ………..
  4. हसणे × ………..

उत्तर:

  1. बेसावध
  2. अशांत
  3. रूंद
  4. रडणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
ट्रेकला जाण्यापूर्वी कोणती तयारी करणे आवश्यक असते?
उत्तरः
आजकालच्या तरुणाई सोबतच शालेय विद्यार्थांमध्ये गड-किल्ल्यांवर ट्रेकला जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र ट्रेकला जाताना अनेक प्रकारची पूर्व तयारी करणे आवश्यक ठरते. ट्रेकला जाण्यापूर्वी ज्या गडावर ट्रेकसाठी जायचे आहे त्या गडाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. एखादा स्थानिक मार्गदर्शक सोबत असणे आवश्यक असते.

पादत्राणे अर्थात बूट ट्रेकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्तम प्रतीचे बूट घालूनच ट्रेक करावा. उन्हाळ्यात ट्रेक करताना पाण्याचा साठा असणाऱ्या गडाची निवड करावी. सूती कपडे घालावे. टोपी व गळयाभवती रूमाल बांधावा. पुरेसे पाणी जवळ बाळगावे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी रात्रीचा प्रवास करावा. पुरेशी दक्षता घेऊन केलेला ट्रेक निश्चितच आनंददायी ठरतो.

घाटात घाट वरंधाघाट Summary in Marathi

पाठपरिचय :

‘भटकंती अनलिमिटेड’ या पुस्तकातून घेतलेल्या ‘घाटात घाट वरंधाघाट’ या पाठात सह्याद्रीमधील वरंधाघाट, वरंधाघाटाची वैशिष्ट्ये व तेथील स्वानुभव लेखकांनी चपखलपणे मांडले आहेत.

The lesson ‘Ghatat Ghat Varandhaghat’ has been taken from the book ‘Bhatkanti Unlimited’ describes the specialities of ‘Varandha Ghat’ which is situated at Sahyadri. The writer also narrates his experiences about the Ghat in this chapter.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

शब्दार्थ :

  1. महिना – मास – month
  2. वारा – पवन, वायू – wind
  3. वार्ता – बातमी, वृत्त – news, message
  4. सरी – पावसाच्या धारा – showers
  5. सुगंध – सुवास – fragrance
  6. इंद्रधनुष्य – आकाशात दिसणारे – rainbow
  7. सप्तरंगी धनुष्य हुरहूर – अपेक्षा – expectancy
  8. गतकाळ – भूतकाळ – past
  9. कुंद – दमट – humid
  10. बंदिस्त – सगळया बाजूंनी बंद असलेले – closed
  11. पाणी – जल, उदक, नीर – water
  12. घाटी – चढण – ascent
  13. रान – जंगल, वन – forest
  14. विहंगम दृश्य – विलोभनीय दृश्य – panoramic view
  15. चमचमीत – मसालेदार, रूचकर – delicious
  16. चापणे – खाणे – to eat
  17. डोंगरमाथा – डोंगराचा सगळ्यात वरचा भाग – top of the mountain
  18. समूह – समुदाय – group
  19. पाषाण – दगड – stone
  20. वेध – लक्ष्य – attention, watch over
  21. बेफाम – बेभान – unrestrained
  22. प्रत्यय – अनुभव – experience
  23. रोरावत – रों रों आवाज करत – sound of water
  24. तहान – तृष्णा – thurst
  25. बांधीव – बांधलेल्या – built up
  26. अरूंद – मर्यादित, छोटे, संकुचित – narrow
  27. कारवी – एक झाड – one of the trees
  28. जोता – पाया – base
  29. अवशेष – शिल्लक राहिलेला भाग – relic, residue
  30. परतीचा प्रवास – return journey
  31. थरार – thrills

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

वाक्प्रचार :

  1. वेध लागणे – एखाद्या गोष्टीकडे लक्ष लागणे, वाट पाहणे
  2. पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे
  3. आतुरतेने वाट पाहणे – मनापासून वाट पाहणे
  4. अर्थ उमगणे – अर्थ कळू लागणे
  5. प्रत्यय येणे – अनुभव येणे
  6. नजरेचे पारणे फिटणे – नजरेला अप्रतिम असे काही दिसणे
  7. सज्ज असणे – तयार असणे
  8. काळजात लख्ख होणे – मनात भीती दाटून येणे

टिपा :

शिवथरघळ – शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. या घळीला ‘समर्थ रामदासस्वामी सुंदर मठ’ म्हणत असत. घळीमध्ये रामदास स्वामींची मूर्ती आहे. समर्थ रामदास यांच्या ‘दासबोधाचा’ जन्म घळीत झाला. शिवथरघळाच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे.