Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश Notes, Textbook Exercise Important Questions, and Answers.
Class 10th Marathi Kumarbharti Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश Question Answer Maharashtra Board
Std 10 Marathi Chapter 20.1 Question Answer
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
टिपा लिहा.
(अ) व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर:
व्युत्पत्ती कोशाचे कार्य: व्युत्पत्ती म्हणजे एखादया शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय, अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश !
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते:
- मराठी भाषेतील – प्रमाण व बोली – शब्दांचे मूळ रूप दाखवणे,
- विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
- भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
- भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.
(आ) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
प्रश्न 2.
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
उत्तर:
व्युत्पत्ती कोश: एखादया शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो, व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.
प्रश्न 3.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तर:
Marathi Kumarbharti Std 10 Guide Pdf भाग-४
- आकाशी झेप घे रे Question Answer (कविता)
- सोनाली Question Answer
- निर्णय Question Answer
- तू झालास मूक समाजाचा नायक Question Answer (कविता)
- सर्व विश्वचि व्हावे सुखी Question Answer
- व्युत्पत्ती कोश Question Answer (स्थूलवाचन)